ब्रेकिंग न्यूज
पिसगाव येथे मिस्त्री कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या Dhiraj Pardeshi Case Update | धीरज परदेशी प्रकरणी पोलिसांची कारवाई | Ahilyanagar Crime News पावसाळ्यात जनावराच्या तोंडाला अन् जिभेवर फोड, असू शकतो गंभीर आजराचा धोका, अशी घ्या काळजी वाह रे मित्र…! घरी आला, खाल्लं, पिलं अन् जाता जाता…, कोल्हापूर पोलिसांनी 24 तासांत उचललं महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम…
SP News Maregaon

थायलंडहून मागवलेल्या बुद्ध मूर्तीची अनाथ पिंडक विहारात प्राणप्रतिष्ठा:228 तरुणांना अधिकारी बनवणाऱ्या अभ्यासिकेसाठी दिली स्वतःची जागा‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


येथील स्थानिक सिद्धार्थ नगर भागातील ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या ‘अनाथ पिंडक बुद्ध विहारात’ थायलंड येथे विशेष स्वरूपात निर्मिती केलेल्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना व बुद्ध स्तूप विहाराचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यानिमित्त आयोजित धम्म रॅलीमुळे बोरगाव मंजू शहरात मंगलमय वातावरण निर्माण झाले. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे थायलंडवरून खास मागवण्यात आलेली भगवान बुद्धांची भव्य मूर्ती होती. या मूर्तीची एका सुशोभित आणि भव्य रथात स्थापना करून शहरात मुख्य मार्गावरून नगरप्रदक्षिणा काढण्यात आली. ही रॅली सिद्धार्थ नगर येथील बुद्ध विहारात पोहोचल्यानंतर मूर्तीची रितसर प्रतिष्ठापना करण्यात आली. संपूर्ण सोहळा दानदाते मधुकरराव तायडे, यशोदाबाई तायडे, यवतमाळचे उपजिल्हाधिकारी राहुल तायडे आणि हर्षा राहुल तायडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. तायडे परिवाराने ही मूर्ती आणि सर्व भिक्खू संघाला संपूर्ण किटसह दान केली. हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी करण्यासाठी अनाथ पिंड बुद्ध विहार समिती, आम्रपाली उपासक-उपासिका संघ, सिद्धार्थ नवयुग मंडळ, विशाखा उपासिका मंडळ (रामजी नगर), पंचशील नवयुग मंडळ, पंचशील व्यायाम शाळा लेझीम पथक, सुजाता उपासक संघ आणि नवयुग मंडळ (भीम नगर) तसेच लॉर्ड बुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक ज्येष्ठ सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी व परिसरातील बौद्ध बांधवांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सचिन तायडे यांनी केले, तर सूत्रसंचालन आदर्श शिक्षक साहेबराव मोरडे गुरुजी यांनी केले. अभ्यासिकेसाठी जमिनीचे दान बोरगाव मंजू येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण ठरली आहे. येथे अभ्यास करून आतापर्यंत २२८ पेक्षा अधिक मुले विविध शासकीय व नामांकित पदांवर रुजू झाली आहेत. या ज्ञानयज्ञाला मोठी मदत म्हणून यशोदाबाई मधुकरराव तायडे व लक्ष्मीबाई वामनराव वानखेडे यांनी स्वतःच्या मालकीचे दोन प्लॉट (जागा) या अभ्यासिकेच्या विस्तारासाठी दान केले. त्यांच्या या दातृत्वाबद्दल भिक्खू संघाच्या वतीने त्यांना साडी-चोळी देऊन सत्कार करण्यात आला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर