ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

मरवडे बायपास प्रश्नात घाईगडबडीने निर्णय घेणे योग्य नाही- खा.प्रणिती शिंदे:ग्रामस्थांच्या मागण्यांसाठी सकारात्मक पाठपुरावा करण्याचे आश्वासन‎

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


“तुम्ही इथे हजर आहात व विरोधक इथे हजर नाहीत म्हणून घाईगडबडीने कोणताही निर्णय घेणे योग्य नाही, मरवडे बायपास प्रश्नात गावाच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी मी शासनाकडे पाठपुरावा करेन,” अशी ग्वाही खासदार प्रणिती शिंदे यांनी दिली. त्या, मंगळवेढा तालुक्यातील मरवडे गावाला भेट देऊन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ ए च्या रुंदीकरण व प्रस्तावित बायपास संदर्भातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेत सर्व वस्तुस्थितीचा आढावा घेतला. त्याप्रसंगी मरवडे येथील सिंहगड महाराज मंदिरासमोर बोलत होत्या. या प्रस्तावित बायपासमुळे गावातील मुख्य बाजारपेठेवर परिणाम होऊन व्यापारी, व्यावसायिक आणि स्थानिक नागरिकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे बायपास न करता गावातून जाणाऱ्या विद्यमान रस्त्याचेच रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. ग्रामस्थांच्या या मागणीची गांभीर्याने दखल घेत खासदार प्रणिती शिंदे यांनी मरवडे येथे प्रत्यक्ष भेट देऊन संबंधित ठिकाणांची पाहणी केली. यावेळी नागरिकांनी विविध सूचना मांडत गावाच्या हिताचा निर्णय घेण्याची विनंती केली. यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, मरवडे गावातील बाजारपेठ, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांचे नुकसान होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल. रस्त्याचे काम करताना सुरक्षित, व्यवहार्य आणि गावाच्या विकासाला पूरक होईल असा मार्ग काढण्यासाठी संबंधित विभाग व यंत्रणांशी चर्चा केली जाईल. सर्व वस्तुस्थिती समजावून घेऊन गावकऱ्यांच्या मागण्या आणि भावना लक्षात घेऊन गावाच्या हिताचा योग्य निर्णय व्हावा यासाठी पाठपुरावा करणार आहे. या पाहणी दौऱ्यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, युवा नेते धन्यकुमार पाटील, प्रदेश चिटणीस ॲड. रवीकरण कोळेकर, जिल्हा समन्वयक मनोज यलगुलवार, ग्रामपंचायत सदस्य संजय पवार यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. मरवडे गावातील ग्रामस्थांनी नुकतीच खासदार प्रणिती शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५६१ एच्या रुंदीकरणाचे काम सुरू असून, हा महामार्ग गावातून न नेता बायपास मार्गाने नेण्याचे नियोजन असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली होती. बाजारपेठ व रोजगारावर परिणाम होण्याची भीती

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर