ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

पुण्याचे 84 विद्यार्थी दुबईत अडकले, इस्त्रायल-इराण युद्धाचा फटका:विद्यार्थी सुखरूप आहेत, घाबरू नका; कॉलेज प्रशासनाची ग्वाही

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा फटका आता पुण्यातील विद्यार्थ्यांना बसला आहे. पुण्याच्या एका नामांकित विद्यालयाचे 84 विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक सध्या दुबईमध्ये अडकले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे सर्व विद्यार्थी एका शैक्षणिक सहलीसाठी दुबईला गेले होते, मात्र तिथेच अडकून पडल्याने पालक आणि प्रशासनाची चिंता वाढली आहे. इराण-इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती आणि विमानतळांवरील व्यत्ययामुळे हे विद्यार्थी तिथेच अडकून पडले आहेत. आमचे 84 विद्यार्थी हे दुबईमध्ये अडकले आहेत. ते ग्लोबल इमर्शन प्रोग्रामसाठी तिथे गेले होते. ते सुखरूप आहेत. आमचे त्यांच्याशी बोलणं होत आहे, काळजी करण्याचे काही कारण नाही. त्यांच्या पालकांशी आमचे बोलणं सुरू होत आहे. आमचे जी लोकं तिथे आहेत, त्यांच्याशी आमचे बोलणं सुरू आहे, असे महाविद्यालयाचे डीन जनार्दन पवार यांनी सांगितले. विद्यार्थ्यी-पालकांनी घाबरू नये जनार्दन पवार म्हणाले की, 42 मुलं आणि 42 मुली तिथे गेलेल्या आहेत. त्यांच्याशी आमचा संवाद सुरू आहे. आमचे विदेश मंत्रालयांसोबत बोलणं सुरू आहे आमचं निवेदन पोहोचला आहे, तर मुरलीधर मोहोळ यांच्याशी बोलणं झाले असून त्यांना निवेदन देण्यात आले आहे. तर दुबईमधील भारतीय दुतावासाशी आमची चर्चा झालेली आहे. आमचे प्रयत्न सुरू आहे की विद्यार्थ्यांना भारतात लवकरात लवकर आणावे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी घाबरू नये असेही त्यांनी म्हटले आहे. कुटुंबासह खामेनींचा अंत अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे केलेल्या एका मोठ्या हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. इराणच्या अधिकृत ‘तसनीम’ आणि ‘फार्स’ या वृत्तसंस्थांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या भीषण हल्ल्यात केवळ अयातुल्ला अली खामेनीच नव्हे, तर त्यांची कन्या, जावई, सून आणि नात यांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण इराण हादरला असून सरकारने देशात 40 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा आणि सात दिवसांच्या सार्वजनिक सुट्ट्यांची घोषणा केली आहे. इराणी राष्ट्रपती भवनावर हल्ला मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि इस्रायलने थेट इराणच्या सत्तेच्या केंद्राला लक्ष्य केले. शनिवारी झालेल्या या कारवाईत इराणी राष्ट्रपती भवनासह अनेक महत्त्वाच्या लष्करी आणि धोरणात्मक ठिकाणांवर क्षेपणास्त्रे डागण्यात आली. खामेनींच्या मृत्यूनंतर इराणने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत प्रतिहल्ला चढवला आहे. इराणने आखाती देशांतील अमेरिकेच्या प्रमुख लष्करी तळांवर आणि इस्रायली शहरांवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला. यामध्ये प्रामुख्याने खालील ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. या महासत्तांच्या थेट संघर्षामुळे जागतिक स्तरावर तिसऱ्या महायुद्धाची भीती व्यक्त केली जात असून, कच्च्या तेलाच्या किमती आणि जागतिक बाजारपेठेवर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर