ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

माती उत्खनन परवानगीसाठी कुंभार समाज झाला आक्रमक:जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदाेलन; जिल्ह्यामधील समाज बांधवावर आता आर्थिक संकटाचे सावट‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


बाळापूर येथील पारंपरिक मातीपासून वीट निर्मिती करणाऱ्या कुंभार समाजातील कारागिरांना माती उत्खननाची परवानगी देण्यात यावी, या मागणीसाठी कुंभार समाज सामाजिक संस्थेकडून बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयाकडून परवागनी मिळाली नसून, उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आले. कुंभार समाज सामाजिक संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार बाळापूर परिसरातील अनेक कुटुंबे पिढ्यानुपिढ्या मातीपासून वीट तयार करण्याचा पारंपरिक व्यवसाय करीत असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. शासनाकडून ७०० ब्रास रॉयल्टी माफ आहे. वीट भट्टी व्यवसायासाठी समाजातील कारागिरांनी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम अंतर्गत बँकेकडून लाखो रुपयांचे कर्ज घेतले आहे. वीट उत्पादनाचा हंगाम हा ७ते ८ महिन्याचा असतो. वेळेत माती उपलब्ध न झाल्यास मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तातडीने माती उत्खननाची परवानगी न दिल्यास समाजातील अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवेल व रोजगार धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. आंदोलनात मनोज बनचरे, संजय वाडकर, महादेव लहुडकर, भास्कर कापडे, रामदास आयस्कर, अजय प्रजापती, मयूर बडदिया, बाळू लहुडकर, गोपाल सोनोने, आनंद सोनोने, दिलीप बनचरे, श्रीराम बनचरे, ऋषिकेश प्रचापती आदी सहभागी झाले. गैरप्रकारांना पायबंदबसणार अनेक ठिकाणी काही जण सवलतीतून घेतलेल्या मातीची विक्री करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. बाळापूर तालुक्यात अनेक ठिकाणी वीट भट्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतरच परवाना देण्यात आला. तसेच काहींनी जमीन महसूल भरण्यासही नकार दिला. हे सर्व गैरप्रकार बंद करण्यात आले आहेत. ९ एप्रिल रोजी होता अर्ज माती उत्खनन परवानगीसाठी ९ एप्रिल २०२६ रोजी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करण्यात आला होता, असे संस्थेने निवेदनात नमूद केले. रॉयल्टीची रक्कम भरूनही परवानगी मिळालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. तहसील कार्यालयात माती उत्खननासाठी किती अर्ज प्राप्त झाले, किती मंजूर झाले आणि कोणत्या निकषांवर मंजुरी देण्यात आली याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर