ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

दिव्यांग उमेदवारांना 38 पायऱ्या चढून‎द्यावी लागली ‘MPSC’ची परीक्षा‎:पोलिस, पालक, नागरिकांच्या आधाराने गाठावी लागली परीक्षा केंद्रातील खोली

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) पूर्व परीक्षा रविवारी सकाळी १० ते १२ या वेळेत जिल्ह्यातील विविध केंद्रांवर झाली. मात्र शहरातील एका परीक्षा केंद्रावर दिव्यांग उमेदवारांना ज्या परिस्थितीत परीक्षा द्यावी लागली, त्याने प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रॅम्प, व्हीलचेअर किंवा पर्यायी प्रवेशमार्गाची व्यवस्था नसल्याने अनेक दिव्यांग उमेदवारांना परीक्षा केंद्र गाठण्यासाठी तब्बल ३८ पायऱ्या चढाव्या लागल्या. या केंद्रावर पायाने दिव्यांग असलेल्या उमेदवारांचा जीव परीक्षा हॉलपर्यंत पोहोचताना अक्षरशः मेटाकुटीला आला होता. काही उमेदवारांना पालकांचा आधार घ्यावा लागला, तर एका उमेदवाराला उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांनी अक्षरश: उचलून वर्ग खोलीपर्यंत नेल्याची घटना घडली. त्यामुळे दिव्यांग उमेदवारांप्रती प्रशासनाचा असंवेदनशील आणि निष्काळजी दृष्टिकोन उघडपणे समोर आला आहे.परीक्षेसाठी आसन व्यवस्था असलेल्या वर्गखोलीत पोहोचण्यापूर्वीच उमेदवारांसमोर अडथळ्यांची मालिका उभी होती. सर्वप्रथम त्यांना सुमारे दीड फूट रुंदीची नाली ओलांडावी लागत होती.परीक्षेसाठी आसन व्यवस्था असलेल्या‎वर्गखोलीत पोहोचण्यापूर्वीच उमेदवारांसमोर‎अडथळ्यांची मालिका उभी होती. सर्वप्रथम त्यांना‎सुमारे दीड फूट रुंदीची नाली ओलांडावी लागत होती.‎ त्यानंतर १८, ६ आणि १४ अशा तीन टप्प्यांत मिळून ३८‎पायऱ्या चढून दुसऱ्या मजल्यावरील परीक्षा कक्षात‎पोहोचावे लागत होते. विशेष म्हणजे, याच इमारतीत‎दुसऱ्या बाजूने प्रवेश केल्यास सुमारे २४ पायऱ्या कमी‎चढाव्या लागल्या असत्या. मात्र प्रशासनाने अशा‎पर्यायी मार्गाची व्यवस्था न केल्याने दिव्यांग‎उमेदवारांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.‎बायोमेट्रीक पद्धती या बाजूने आहे, म्हणून त्या बाजूने‎व्यवस्था केली नसल्याची चर्चा या परीक्षा केंद्रावर‎सुरू होती. शहराच्या विविध भागातील ४७ केंद्रांवरुन (शाळा-महाविद्यालये) ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी तब्बल १३ हजार ६७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या सर्व पदवीधरांना ‘एमपीएससी’तर्फे प्रवेशपत्रेही पाठवण्यात आली होती. परंतु ऐन परीक्षेवेळी २ हजार २६३ विद्यार्थी अनुपस्थित असल्याची नोंद करण्यात आली आहे. ही संख्या प्रति केंद्र सरासरी ४८ एवढी आहे. आसन व्यवस्था तळमजल्यावर असावी, अशी कोणती तरतूद नाही उमेदवारांची आसन व्यवस्था आयोगाकडून निश्चित केली जाते. दिव्यांगांसाठी तळ मजल्यावर स्वतंत्र आसन व्यवस्था असावी, अशी तरतूद नियमांत नाही. आयोगाकडून प्राप्त रोल नंबरनुसारच आसन व्यवस्था केली जाते. मात्र, तळमजल्यावर रॅम्पची सुविधा आवश्यक आहे. दृष्टीहीन परीक्षार्थींनी सहायक , दिव्यांग परिक्षार्थींना परीक्षेसाठी अतिरिक्त वेळ देण्यात येतो, ती सुविधा आयोगाकडून देण्यात येते. – संतोष काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी. अधिवेशनात मुद्दा मांडणार दिव्यांग उमेदवारांना ३८ पायऱ्या चढून परीक्षा द्यावी लागणे, हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. याबाबत प्रशासनाकडून माहिती घेणार असून, येत्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा सभागृहात निश्चितपणे मांडणार आहे. दिव्यांगांच्या हक्कांशी तडजोड करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. – बच्चू कडू, आमदार, माजी अध्यक्ष दिव्यांग मंत्रालय. तळमजल्यावर व्यवस्था करण्याची जुनी ‎मागणीही दुर्लक्षित दिव्यांग उमेदवारांनी यापूर्वीही‎परीक्षा केंद्रांवर तळमजल्यावर आसन व्यवस्था‎करण्याची मागणी केली होती. मात्र या मागणीकडे‎दुर्लक्ष होत असल्याची खंत दोन परीक्षार्थींनी ‘दिव्य‎मराठी’शी बोलताना व्यक्त केली. एका दिव्यांग‎परीक्षार्थ्याने सांगितले की, ‘आमच्यासाठी इतक्या‎पायऱ्या चढणे त्रासदायक असते. परीक्षा असल्यामुळे‎पर्याय नसतो आणि आम्हाला जावेच लागते. अनेक‎वेळा तळमजल्यावर आसन व्यवस्था करण्याची‎मागणी केली, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.‎ पुढील काळात तरी प्रशासनाने दिव्यांग उमेदवारांसाठी‎स्वतंत्र आणि सुलभ व्यवस्था करावी.‎

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर