ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

एक धमकी आली तर घाम फुटला,तुम्ही स्वतःला भगतसिंग समजता का?:प्रसाद लाड यांच्या धमकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात!

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भारतीय जनता पक्षाचे गुंड आम्हाला रोज धमक्या देतात आम्ही तक्रारी करतो का? आम्ही लढतो आहोत. तुम्हाला एक धमकी आली तर तुम्हाला घाम फुटला असे उबाठाचे नेते संजय राऊत यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना आलेल्या धमकीवर बोलताना म्हटले आहे. देशामध्ये आता झुरळ बंड करायला लागले तर विषय धमकीच्या पुढे काही होऊ शकते. संजय राऊत म्हणाले की, भाजपवाले किती षंढ आहेत हे गेल्या दोन दिवसांमध्ये देशाच्या पंतप्रधानांनी दाखवले आहे, ऑपरेशन सिंदूरपासून. सत्ताधारी पक्षातील माणसाला धमकी येऊच शकत नाही. त्यांना किती सुरक्षा आहे ते पहावे. स्वत:च्या 25 गाड्या आणि सरकारच्या 4 गाड्या फिरतात. तुम्ही असे काय काम केले आहे महाराष्ट्रासाठी? देशासाठी? तुम्ही काय स्वत:ला भगतसिंग समजतात का? आमच्या पक्षाला षंढ म्हणणाऱ्या लोकांनी स्वत:च्या लेंग्याची नाडी सोडून बघावे तुम्ही कोण आहात, असा टोलाही राऊत यांनी लगावला आहे. लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न संजय राऊत म्हणाले की, भाजपच्या लोकांकडून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशभरात पेट्रोल-डिझेलसाठी मोठ्या रांगा लागल्या आहेत. पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीवर काहीही बोलले जात नाही. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसहे कोणता पक्ष टिकू देणार नाही. झुरळे सरकारला सळो की पळो करतील संजय राऊत म्हणाले की, झुरळ जनता पार्टी ही सोशल मिडीयावर सरकारविरोधात लढत आहे. झुरळ पक्षाचा मी जाहीर नामा वाचला आहे, ते जे अभिजीत दिपके आहेत त्यांनी ते बोस्टन विद्यापीठात शिकत आहे. मी त्यांची भूमिका समजून घेतली. जेव्हा तरुण विद्रोहासाठी उभे राहतात, त्यावेळी तरुणांचे मन समजून घेतले पाहिजे. ज्यांची डिग्री धूळ खात पडली आहे, पेपर फुटीमुळे ज्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे त्यांच्यासाठी हा पक्ष आहे. निवडणूक आयोग, न्यायालय असे कोणाकडूनही ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांचा हा पक्ष आहे. त्यांना मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे सरकार घाबरले आहे. आता दोन पायाची झुरळे सरकारला सळो की पळो करतील.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर