ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

होळकर घाटाच्या पुनर्बांधणीसाठी निधी द्या- मा.आ. स्नेहलता कोल्हे

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र पुणतांबा येथील गोदावरी नदीवरील ऐतिहासिक होळकर घाटाच्या पुनर्बांधणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात कोल्हे यांनी म्हटले आहे की, श्रीक्षेत्र पुणतांबा हे प्राचीन तीर्थक्षेत्र असून येथे गोदावरी नदी उत्तरवाहिनी होत असल्याने या गावाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सन १७६५ ते १७९५ या कालावधीत येथे भव्य होळकर घाट उभारला होता, तसेच परिसरातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला होता. सद्यस्थितीत गोदावरी तटावर धार्मिक विधी व अस्थी विसर्जनासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात. त्यामुळे या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करण्यासाठी होळकर घाटाची पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे. या तीर्थक्षेत्राचा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या दृष्टीने विशेष निधी उपलब्ध करून संबंधित विभागांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे. पुणतांबाचा सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा… पुणतांबा हे प्रख्यात संगीतकार सी. रामचंद्र (रामचंद्र चितळकर) यांचे जन्मभूमी आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या “ए मेरे वतन के लोगो” या अजरामर गीताला संगीत देण्याचे श्रेय त्यांना जाते. येथे गोदावरी तटावर होळकर घाटासह ब्राह्मण घाट आणि विठ्ठल घाट असे तीन प्रमुख घाट असून, परिसरात अहिल्यादेवींनी बांधलेला वाडा आजही जीर्ण अवस्थेत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर