ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: ‘ऑक्टोबर हिट’मुळे रेल्वेचा खोळंबा, मुंबईत रुळांच्या प्रसरणाने प्रवाशांचे हाल, काय घडतंय? ✦ ⚡ वन्यजीव संरक्षणाचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत! ✦ ⚡ कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार, एकाचा खून, पित्रा-पुत्रासह तिघांना जन्मठेप, काय घडलं? ✦ ⚡ Pune Video:पुण्यातील MPSCविद्यार्थ्यांना पोलिसांकडून नोटीस, २९ क्लास, अभ्यासिका चालकांनाही नोटिसा ✦ ⚡ लिलाबाई बापूराव कुचनकर यांचे निधन ✦ ⚡ चारा संपला, पाणीही नाही प्यायला, जिवापाड जपलेल्या मुक्या जिवाला अर्ध्या किंमतीत विकायची वेळ, बीडमधलं भीषण व… ✦ ⚡ ‘आई मला वाचव’ तरुणाचा व्हॉट्सॲपवर मेसेज अन् घडलं भयंकर, पंढरपूरमधील त्या घटनेने एकच खळबळ ✦ ⚡ Eknath Shinde Amit Shah: दिल्लीत खलबतं, महाराष्ट्रात टेन्शन! एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; अमित शाहांसो… ✦ ⚡ Instagram वर मैत्री, लिव इन रिलेशनशीपमध्ये असताना मृत्यू, कल्याणच्या मुलीसोबत छत्तीसगडमध्ये काय घडलं? ✦ ⚡ दिनेश धोंडूजी वैद्य यांच्या ३० वर्षांच्या ज्ञानयज्ञाची सांगता
SP News Maregaon

राज्यात आजपासून 3 दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी:ब्रह्मपुरी 46.6 अंशांवर, छत्रपती संभाजीनगर @39.8

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मराठवाड्यासह राज्यभरात बुधवार, 27 ते 29 मेपर्यंत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यात 2, मध्य महाराष्ट्रात 3 तर विदर्भात 4 दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून काही ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. दरम्यान, सोमवारी झालेल्या पावसानंतर छत्रपती संभाजीनगरात मंगळवारी तापमान 1.4 अंश सेल्सियसने घसरले. सोमवारी तापमान 41.2 होते ते मंगळवारी 39.8 अंश सेल्सियसवर आले. विदर्भ मात्र उन्हाच्या तडाख्यात होरपळत असून मंगळवारी राज्यातील सर्वाधिक ब्रह्मपुरी येथे 46.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. जळगाव, अहिल्यानगरात पारा 40 अंशाच्या वरच होता तर नाशिक, सो लापूरचा पारा 40 अंशाखाली होता. दोन दिवस सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; हवामानशास्त्र विभागाचा ‘यलो अलर्ट’ छत्रपती संभाजीनगर शहर व परिसरात सोमवारी (25 मे) पूर्वमोसमी सरींनी हजेरी लावल्यानंतर बुधवार व गुरुवारीही सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. पावसासंदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला असून येणाऱ्या 2 दिवसांत ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, मंगळवारी (26 मे) शहरातील कमाल तापमान 39.8 अंश सेल्सियसपर्यंत कमी झाले. या महिन्यात 9 मेनंतर प्रथमच तापमान 40 अंशांपेक्षा कमी झाले आहे. पूर्वमोसमी पाऊस प्रामुख्याने सायंकाळीच पूर्वमोसमी पाऊस प्रामुख्याने सायंकाळीच पडण्यामागील शास्त्रीय कारणे खालीलप्रमाणे आहेत…
तीव्र तापमान : उन्हाळ्यात सकाळी 11 ते दुपारी 3 यादरम्यान जमीन प्रचंड तापल्याने स्थानिक पातळीवर तापमान खूप वाढते.
अभिसरण प्रक्रिया : तापलेली हवा हलकी होऊन वेगाने वातावरणात वरच्या दिशेने प्रवास करू लागते.
आर्द्रतेचा पुरवठा : वरच्या दिशेला जाणाऱ्या या उष्ण हवेत समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात बाष्प मिसळते.
वादळी ढगांची निर्मिती : दुपारपर्यंत बाष्पाचे सांद्रीभवन होऊन आकाशात उंच आणि उभ्या आकाराचे वादळी (क्युमुलोनिम्बस) ढग तयार होतात.
सायंकाळी पर्जन्यवृष्टी : ही प्रक्रिया पूर्ण होण्यास दुपार उलटते. सायंकाळी तापमान थोडे कमी होताच मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो. आज, उद्या पाऊस शहर आणि परिसरात बुधवारी आणि गुरुवारी मेघगर्जना, विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर शहरात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बुधवारी कमाल तापमान 41 आणि गुरुवारी 39 अंशांपर्यंत राहील. त्यानंतर शुक्रवारी व शनिवारी आकाश निरभ्र राहील. रविवारी व सोमवारी दुपारनंतर अंशत: ढगाळ वातावरण राहील. यंदा पूर्वमोसमी सरींची पाठ गेल्या वर्षी शहर आणि परिसरात मे महिन्यात 8 ते 9 दिवस पाऊस पडल्याची नोंद आहे. यंदा मात्र मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आतापर्यंत 1 दिवस पाऊस पडला आहे. मे महिन्यात शहर व परिसरात 12.2 मिलिमीटर सरासरी पाऊस पडतो. यंदा आतापर्यंत 4.8 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात शहरातील छत्रपती संभाजीनगर महसूल मंडळात 98.5, उस्मानपुरा 175.9, भावसिंगपुरा,160.9, कांचनवाडी 126.2 आणि चिकलठाणा महसूल मंडळात 131.8 मिलिमीटर पाऊस पडल्याची राज्य सरकारकडे नोंद आहे. त्या तुलनेत यंदा मे महिन्यात पूर्वमोसमी पाऊस कमी पडला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर