ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

भाजप नेत्यांना कुडाळ कोर्टाचा दणका:नीतेश राणे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकरांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट; नेमके प्रकरण काय?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ न्यायालयाने भाजपचे आमदार नीतेश राणे, प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांना मोठा कायदेशीर दणका दिला आहे. ‘संविधान बचाव’ आणि ओबीसी आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनाशी संबंधित एका प्रकरणात न्यायालयाने या तिन्ही नेत्यांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. वारंवार न्यायालयाच्या सुनावणीला गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने हा कठोर निर्णय घेतला आहे. हे प्रकरण २६ जून २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या आंदोलनाशी संबंधित आहे. त्यावेळी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपने ‘संविधान बचाव’ आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवत कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात माजी आमदार राजन तेली, आमदार नीतेश राणे, नीलेश राणे आणि प्रसाद लाड यांच्यासह एकूण ४२ जणांचा आरोपी म्हणून समावेश आहे. न्यायालयाच्या तारखांना वारंवार गैरहजेरी या प्रकरणाची सुनावणी कुडाळ न्यायालयात सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीला नीलेश राणे, राजन तेली आणि इतर काही आरोपी न्यायालयात हजर होते. मात्र, आमदार नीतेश राणे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्यासह अन्य पाच जण गैरहजर राहिले. नीतेश राणे यांच्या वकिलांनी त्यांच्या गैरहजेरीबाबत न्यायालयात सवलतीचा अर्ज दिला होता. मात्र, न्यायालयाने हा विनंती अर्ज फेटाळून लावला. यापूर्वीही सुनावणीच्या अनेक तारखांना हे नेते गैरहजर राहिल्याचे निदर्शनास आल्यावर, न्यायालयाने कडक पवित्रा घेत थेट अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. आता पुढे काय होणार? अजामीनपात्र अटक वॉरंट जारी झाल्यामुळे या नेत्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता त्यांना न्यायालयात स्वतः हजर होऊन हे वॉरंट रद्द करून घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. अन्यथा, तांत्रिकदृष्ट्या पोलिसांना त्यांना ताब्यात घेण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर