ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला:विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भेट; दोन्ही नेत्यांच्या भेटीमागे काय आहे राजकारण?

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण तापले असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ही केवळ सौजन्यभेट होती की यामागे आगामी राजकीय घडामोडींची एखादी नवी रणनीती आहे? याविषयी विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीमुळे राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडत असताना संजय राऊत यांनी शुक्रवारी सकाळी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांच्या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण त्यांच्यात विधान परिषद निवडणूक, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तसेच राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती यावर चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी आपली आगामी रणनीती ठरवण्यासाठी पुढील पाऊल उचलल्याचा दावाही केला जात आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, संजय राऊत हे उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यात संवादाचा पूल म्हणून ओळखले जातात. गेल्या काही वर्षांत ठाकरे बंधूंमध्ये संवाद वाढवण्यासाठी त्यांनी अनेकदा पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मराठी अस्मिता, मराठी माणसांचे प्रश्न आणि मुंबईतील स्थानिक मुद्द्यांवर दोन्ही पक्षांमध्ये सहकार्याची चर्चा सुरू झाली होती. त्या काळात संजय राऊत यांनी दोन्ही नेत्यांमधील संवाद वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ठाकरे बंधूंची युती राज्यात चर्चेचा विषय महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे गट व मनसे यांची युती नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. दोन्ही पक्षांची विचारधारा मराठी अस्मिता आणि महाराष्ट्राच्या हिताच्या मुद्द्यांभोवती केंद्रित असल्याने त्यांच्यातील राजकीय समीकरणांकडे सर्वांचे लक्ष असते. अशा परिस्थितीत संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यातील आजची भेट भविष्यातील राजकीय घडामोडींसाठी महत्त्वाची मानली जात आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून जोरदार मोर्चेबांधणी केली जात असताना विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये वाढलेला संवादही चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या आजच्या भेटीमागे नेमका कोणता राजकीय संदेश दडलेला आहे, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यातील आजच्या भेटीतून नेमके काय निष्पन्न झाले? याबाबत लवकरच अधिक स्पष्टता येईल. पण तूर्त या भेटीविषयी राज्याच्या राजकारणात खमंग चर्चा सुरू झाली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर