ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

तटकरे – पवारांच्या भेटीवर राजकीय वावड्या:चर्चा रंगवण्यात अर्थ नाही -पाटील; भेटीचा राजकीय संदर्भ काढण्याची गरज नाही – बावनकुळे

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. एनसीपीच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून तटकरे व प्रफुल्ल पटेल यांची कथितपणे हकालपट्टी केल्यानंतर तटकरेंनी ही भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क रंगले आहे. पण तटकरेंनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे स्पष्ट केले. मंत्री अनिल पाटील व चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या भेटीमागे कोणतेही राजकारण नसल्याचे स्पष्ट केले. तरीही या भेटी भवतालच्या चर्चांना अद्याप पूर्णविराम मिळालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. पक्षाच्या नव्या कार्यकारिणीची यादी असलेले एक पत्र व्हायरल झाले असून, त्यात प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे यांची नावे नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकारिणीमधून या दोन्ही नेत्यांना ज्येष्ठ नेत्यांना डच्चू देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर सुनील तटकरे यांनी मंगळवारी सायंकाळी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीविषयी राजकीय वर्तुळात खमंग चर्चा रंगली असताना स्वतः तटकरे यांनी या भेटीमागे कोणतेही राजकीय कारण नसल्याचे स्पष्ट केले आहे. स्वतः सुनील तटकरे भेटीवर काय म्हणाले? सुनील तटकरे म्हणाले, शरद पवार साहेब यांची भेट घेण्याची वेळ काल मिळाली होती. त्यामुळे मी त्यांची भेट घेण्यासाठी गेलो होतो. ते गेली 6 दशके देशाच्या राजकारणात एक महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मी सुद्धा त्यांच्या नेतृत्वात दिर्घकाळ काम केले. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणे सदिच्छा भेट घेणे ही संस्कृती आहे. तेवढेच कारण त्या भेटीमागे होते. त्यामागे इतर कोणतेही राजकीय कारण नाही. तटकरे अन्य एका पोस्टद्वारे म्हणाले, काल आदरणीय शरद पवार साहेबांची त्यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, प्रकृतीची विचारपूस केली. गेल्या काही काळात साहेबांची तब्येत ठीक नव्हती, त्याकरता ते ब्रीचकँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. तेव्हापासून त्यांच्या भेटीसाठी जाण्याचे प्रयोजन होते, परंतु मधल्या काळात वेळ जुळून येत नसल्याने ही भेट अखेरीस काल झाली. या भेटीत कुठल्याही राजकीय विषयांवर चर्चा झाली नाही, तसा कुठला उद्देशही या भेटीचा नव्हता.

गेली सहा दशके साहेब देशाच्या राजकारणात महत्वाचे योगदान देत आहेत. मी दीर्घकाळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले, माझ्या राजकीय जडणघडणीत त्यांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे भेट देणे, तब्येतीची विचारपूस करणे हा महाराष्ट्राच्या राजकारणापलीकडच्या समृद्ध राजकीय परंपरेचा भाग आहे. या परंपरेला अनुसरूनच ही भेट झाली. साहेबांची प्रकृती आता उत्तम असून त्यांची काम करण्याची ऊर्जा पूर्वीसारखीच आजही कायम आहे.

तटकरेंनी पवारांच्या तब्येतीची विचारपूस केली – अनिल पाटील दुसरीकडे, राष्ट्रवादीचे अन्य एक ज्येष्ठ नेते तथा मंत्री अनिल पाटील यांनीही यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, मला असे वाटते आता ज्या पद्धतीने चर्चा रंगल्या आहेत किंवा रंगवल्या जात आहेत त्याला काहीही अर्थ नाही. सुनील तटकरे हे शरद पवारांची भेट घेण्यासाठी मागील 8 दिवसांपासून प्रयत्नशील होते. काल सुनेत्रा वहिनी व ते गुवाहाटीला हिमंता बिस्वा शर्मा यांच्या शपथविधीला जाऊन आले. येताना त्यांची चर्चा झाली. त्यानंतर ते शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेले. पवार साहेब हे देशाचे नेते आहेत आणि देशाच्या नेत्याची आत्ताच रुग्णालयातून सुट्टी झाली असेल, तर त्या नेत्याची विचारपूस करण्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून तटकरेंची आहे. राजकीय वावड्या उठवणे चुकीचे – बावनकुळे भाजप नेते तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या प्रकरणी राजकीय वावड्या उठवणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, शरद पवारांच्या व सुनील तटकरेंच्या भेटीविषयी राजकीय वावड्या उठवणे चुकीचे आहे. कारण, तटकरेंनी व त्यांच्या कुटुंबीयांनी आयुष्यभर शरद पवारांसोबत त्यांच्या राजकीय व सामाजिक आणि सर्वच कौटुंबिक पातळीवर त्यांचा संबंध राहिला आहे. त्यामुळे आपल्या स्नेह्यांशी कधी भावनेतून, तर कधी सहजपणे चर्चा करावी वाटते. त्यातून ही भेट झाली असेल. मी स्वतः राज ठाकरेंकडे जाऊन आलो. त्यात काही राजकीय अर्थ नसतात. त्यामुळे त्याचा काही राजकीय संदर्भ घेण्याची गरज नाही. प्रफुल्ल पटेल नाराज दरम्यान, सुनेत्रा पवारांनी प्रफुल्ल पटेल यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवरून कथितपणे डच्चू दिल्यामुळे पटेल नाराज झाल्याची चर्चा समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रफुल पटेल पक्षाच्या सध्याच्या निर्णयामुळे अस्वस्थ झालेत. त्यामुळे ते पुढे कोणता राजकीय निर्णय घेतात हे पाहावे लागेल.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर