ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

1200 लोकसंख्येच्या कापशीत 2800 झाडांचे ऑक्सिजन पार्क:सोशल मीडियावरील मेसेज ठरले प्रेरणादायी; गावात 3 एकरात करण्यात आली देशी झाडांची लागवड‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


‘भविष्यात शुद्ध हवा आणि ऑक्सिजन मिळणार नाही’ अशा सोशल मीडियावरील केवळ चिंताजनक चर्चांवर न थांबता, जिल्ह्यातील कापशी गावाने प्रत्यक्ष कृतीतून एक आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. अवघी १२०० लोकसंख्या असलेल्या या गावात तब्बल २८०० देशी झाडांचा ‘ऑक्सिजन पार्क’ साकारण्यात आला आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि ४७ अंश सेल्सियसपर्यंत पोहोचणाऱ्या कडक उन्हाळ्याच्या काळात ग्रामस्थांनी एकत्र येत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. कापशी गावात इंग्रजकालीन मोठा नैसर्गिक तलाव आहे. या तलावाच्या पायथ्याशी असलेल्या सुमारे ३ एकर गायरान आणि मोकळ्या जागेचा वापर या प्रकल्पासाठी करण्यात आला. दोन वेगवेगळ्या प्लॉटमध्ये ही लागवड उर्वरित पान ४ अतिक्रमणधारकांना फळबागेतून रोजगार गावातील आणखी अतिक्रमित जागेवर असाच ऑक्सिजन पार्क व फळबाग उभारली जाणार आहे. विशेष म्हणजे, ज्या लोकांनी ग्रामपंचायतीच्या जागेवर अतिक्रमण केले आहे, त्यांना तेथून न हटवता त्याच जागेवर देशी फळझाडे लावून दिली जातील. या झाडांपासून मिळणारे उत्पन्न त्याच लोकांच्या उदरनिर्वाहासाठी दिले जाईल. यामुळे अतिक्रमणही निघेल. कुटुंबांना रोजगार मिळेल. गावाला शुद्ध हवाही मिळेल. ^भावी पिढीला आपण काहीतरी देणे लागतो व त्यासाठी कायमस्वरुपी काम उभारण्याचा संकल्प करून तलावाच्या पायथ्याशी २८०० देशी झाडे लावली. झाडांशी मैत्री केल्याशिवाय आपल्याला शुद्ध हवा आणि पाणी मिळणार नाही. – विठ्ठलराव चतरकर, सरपंच, कापशी. {क्षेत्र- 3 एकर {झाडांतील अंतर 10X10 {एकूण झाडे 2800 {एकूण खर्च- 20 लाख {झाडांचे वय 2 वर्षे (उंची 8 फूट) वृक्षलागवड एका नजरेत भावी पिढीसाठी उभारणी; झाडांशी मैत्री केल्याशिवाय शुद्ध हवा नाही

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर