ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

योग, लाठी-काठी, पोवाडे, भजनांचे सादरीकरण करत जिंकली मने:दानापूर येथे सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचा उत्साहात समारोप‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


श्री गुरुदेव सेवा मंडळ व दानापूर ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्वांगीण सुसंस्कार शिबिराचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात झाला. गेल्या पाच वर्षांपासून नियमितपणे आयोजित होणाऱ्या या शिबिरात यंदा शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. समारोप कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मंगलाचरण, संकल्पगीत, स्वागतगीत, भजन, पोवाडे सादर केले. १२ मेपासून सुरू झालेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांना ध्यान, योग, प्रार्थना, लाठी-काठी, व्यायाम, गीत, बौद्धिक मार्गदर्शन, संस्कृत भाषेचे ज्ञान, गायन-वादन, वकृत्व प्रशिक्षण देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मन, मेंदू, मनगटाचा विकास व्हावा हा उद्देश होता. त्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रायजीप्रभू शेलोटकर, संतोष खोडे, सुनील महाराज गावंडे, अमझरे महाराज, इंगळे गुरुजी, ॲड. अजित सेंगर, अभिजित इंगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी दहावी परीक्षेत उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या गुरुदेव सेवा मंडळाच्या बाल स्वयंसेवकांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. विविध खेळ व सामान्यज्ञान स्पर्धांमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शिबिरासाठी १२ दिवस तन, मन, धनाने योगदान देणाऱ्या स्वयंसेवकांचाही सत्कार करण्यात आला. शिबिरादरम्यान गावकऱ्यांनी विद्यार्थ्यांसाठी अन्नदान, दूध, नाश्त्याची व्यवस्था केली. सर्व दानदात्यांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सपना वाकोडे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रीती राऊत, माणिकराव इंगळे, ॲड. अजित सेंगर, डॉ. डाबरे, अस्वार, रौंदळे, वसंत वाघमारे, रायजीप्रभू शेलोटकर महाराज, अमझरे महाराज, संतोष दादा वाघमारे, अभिजित इंगळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ॲड. अजित सेंगर यांनी केले. प्रास्ताविक माणिकराव इंगळे यांनी केले. मातृ-पितृ पादप्रक्षालन कार्यक्रम ठरला विशेष शिबिरात मातृ-पितृ पादप्रक्षालन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी सर्व पालक व विद्यार्थ्यांसाठी प्रेस क्लब दानापूर यांच्या वतीने महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. शिबिराच्या समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांनी भगवे फेटे बांधले. विद्यार्थिनींनी पारंपरिक वेशभूषा परिधान केली. योग, लेझीम, लाठी-काठी, व्यायामाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. भजन व पोवाड्यांचे प्रभावी सादरीकरण झाले. उपस्थित मंत्रमुग्ध झाले. प्रात्यक्षिकांना आगळेवेगळे स्वरूप लाभले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर