ब्रेकिंग न्यूज
FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report पत्नी अन् लेकरांना सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी गाठलं महाराष्ट्र; पण कामावर जाताच संदीपसोबत भयंकर घडलं PM Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ एका चुकीमुळे थांबणार पीएम-किसानचे ६,००० रुपये! 10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज…
SP News Maregaon

बुलढाण्यात रुग्णालयातून सिलिंडरच लंपास:गॅससाठी रांगा, पण चोरट्याची थेट स्वयंपाकघरावर नजर; रुग्णालयाच्या किचनमधून चोरी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


देशभरात गॅस सिलेंडरच्या तुटवड्याबाबत चर्चा सुरू असताना बुलढाणा जिल्ह्यात एक धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. गॅस मिळवण्यासाठी नागरिकांना एजन्सीबाहेर लांबच लांब रांगा लावाव्या लागत असताना एका चोरट्याने थेट रुग्णालयाच्या स्वयंपाकगृहातून भरलेला गॅस सिलिंडर पळवला. बुलढाणा शहरातील क्षयरोग आरोग्यधाम म्हणजेच टीबी रुग्णालयात ही घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून रुग्णालय प्रशासनही सतर्क झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्याने रुग्णालयाच्या स्वयंपाकगृहाचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्या ठिकाणी एकूण सतरा गॅस सिलिंडर ठेवण्यात आले होते. त्यापैकी एक भरलेला सिलिंडर चोरट्याने पळवून नेल्याचे उघड झाले आहे. याशिवाय स्वयंपाकगृहातील काही साहित्यही चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. गॅस सिलेंडरची चोरी झाल्याची माहिती मिळताच परिसरात चर्चा सुरू झाली. या घटनेनंतर काही रुग्णालयांतील कॅन्टीन चालकही सतर्क झाले असून रात्री सुरक्षा वाढवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गॅस पुरवठ्याबाबत राज्यातील काही भागात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाकडून गॅसचा पुरेसा साठा असल्याचे सांगितले जात असले तरी घरपोच वितरण सेवा बंद झाल्याने नागरिकांना एजन्सीबाहेर जाऊन सिलिंडर घ्यावे लागत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी सकाळपासूनच नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून येत आहे. गॅसचा तुटवडा नसल्याचा दावा गॅस वितरणात हेराफेरी होत असल्याचाही आरोप काही नागरिकांनी केला आहे. वितरण करणारे कर्मचारी ओळखीच्या लोकांना प्राधान्य देत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. एजन्सी सुरू होण्यापूर्वीच सकाळी सात वाजल्यापासून नागरिक रांगेत उभे राहत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासनाकडून गॅसचा तुटवडा नसल्याचा दावा केला जात असला तरी नियोजनातील त्रुटींमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे गॅस पुरवठ्याच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर