ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

देवस्थान जमीनीसाठी 15 सप्टेंबरपर्यंत नव्या हरकतींची मुदत:नागपुरात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्रातील देवस्थानांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या मालकीच्या जमिनींवरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या “महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम, 2026’ च्या मूळ मसुद्याला राज्य सरकारने तूर्तास स्थगिती दिली आहे. आता या कायद्याचे “सुधारित प्रारूप’ तयार करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे शनिवारी केली. नागरिकांना आणि देवस्थानांना या सुधारित प्रारूपावर 15 सप्टेंबर 2026 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात आपल्या हरकती नोंदवता येणार आहेत. संभ्रम दूर करण्यासाठी सरकारचे पाऊल या कायद्याचे प्रारूप 6 मे ते 5 जून 2026 दरम्यान जनतेच्या सूचनांसाठी उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, यावर मोठ्या प्रमाणात हरकती आल्यामुळे आणि काही घटकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी शासनाने जुन्या प्रारूपाला स्थगिती दिली आहे. खारगे समिती 15 ऑगस्ट 2026 पर्यंत आपला अहवाल सरकारला सादर करेल. त्यानंतर नवीन प्रारूप पुन्हा एकदा पब्लिक डोमेनवर प्रसिद्ध केले जाईल. आगामी डिसेंबर महिन्यातील विधिमंडळ अधिवेशनात हा अंतिम कायदा मंजुरीसाठी आणला जाईल, असा विश्वास महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला. राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून देवस्थानांना मिळालेल्या सुमारे साडेपाच लाख हेक्टर “देवस्थान इनाम’ जमिनी आहेत. या जमिनींवर सध्या मोठ्या प्रमाणावर बलाढ्य लोकांची अतिक्रमणे झाली असल्याचे सांगण्यात आले. खारगे समितीमध्ये कुणाचा समावेश? नवीन मसुदा तयार करणाऱ्या या समितीत अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्यासह विभागीय आयुक्त (पुणे व कोकण), जिल्हाधिकारी (ठाणे व अहिल्यानगर), सहसचिव मनीषा जायभाये आणि सदस्य सचिव म्हणून सहसचिव कैलास अर्जुन गायकवाड असतील. तसेच महसूलमंत्र्यांमार्फत नियुक्त केलेले राज्यातील विविध देवस्थानांचे 15 प्रतिनिधी यात समाविष्ट असतील.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर