ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत पेच:छगन भुजबळांच्या दोन अटी, तर नवनीत राणांनी घेतली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट, सस्पेन्स वाढला

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे एकाला राज्यसभेवर जाण्याची संधी आहे. या जागेवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दावा केला आहे. तर दुसरीकडे माजी खासदार नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. यामुळे आता राज्यसभेसाठीच्या जागेवर राणांना संधी मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे. या संपूर्ण वादात शनिवारी भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. भाजप ही जागा नवनीत राणा यांच्यासाठी राष्ट्रवादीकडून मागेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यातच रविवारी सकाळी नवनीत राणा यांनी अचानक मुंबईत येऊन ‘देवगिरी’ बंगल्यावर थेट सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. नवनीत राणा आणि सुनेत्रा पवार यांच्यात बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. भुजबळांच्या पुतण्यासाठी दोन अटी दरम्यान छगन भुजबळ यांनी खासदारकीसोबत दोन अटी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांपुढे घातल्या आहेत. त्यातील एक अट म्हणजे त्यांच्या रिक्त होणाऱ्या विधानसभेतील येवला मतदारसंघाची जेव्हा पोटनिवडणूक होईल तेव्हा त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यालाच पक्षातर्फे उमेदवारी मिळाली पाहिजे. दुसरी अट म्हणजे निवडून आल्यावर समीर यांना महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्रिपदही मिळालेच पाहिजे. राष्ट्रीय नेता बनण्याची भुजबळांची इच्छा सूत्रांनी सांगितले की, छगन भुजबळ यांची प्रतिमा महाराष्ट्रातील ओबीसींचे नेते अशी झाली आहे. राज्यसभेत जाऊन ही प्रतिमा त्यांना राष्ट्रीय पातळीवर नेण्याची तीव्र इच्छा आहे. मात्र, राज्यातील राजकारणात अप्रत्यक्ष सहभागही हवा आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील बदलती राजकीय, सामाजिक समीकरणे पाहता भुजबळ दिल्लीत गेलेले बरे, अशी भावना राष्ट्रवादीतील तरुण नेते व्यक्त करत आहेत. सूत्रांचे असेही म्हणणे आहे की, नवनीत राणांनी भाजपसोबतच राहणार अशी भूमिका घेतल्याने त्यांना संधी मिळणार नाही.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर