ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

अहिल्यादेवी स्त्री अस्मितेचा ललकार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


स्त्रियांनीच सती काय जायचे? सतीचे देव्हारे पुरुष का माजवितात? कोण म्हणतो हा धर्म! ही तर एक अंधरुढी आहे. काय हे बाईचं जीणं, केवळ मरण! त्यांच्या जळण्याचा ना खेद, ना दु:ख. बाई जर मेली तर एक पुरुष सती जाणार नाही. तो पंधराव्या दिवशी बोहल्यावर चढेल.’ असे म्हणत त्यांनी सतीच्या चाली विरुध्द बंडाचा झेंडा उगारला होता. मात्र सुमारे ३०० वर्षांपूर्वी स्वत:चे मुलाचे दुर्गुण वधूच्या मातापित्यांना स्पष्टपणे सांगितल्याचे दिसते. हा त्यांचा दुर्मिळ गुण आजही सर्वांना बोध घेणारा वाटतो. मुलाच्या लग्नप्रसंगी मुलीच्या आई- वडीलांकडून सुतळीच्या तोड्याची सुध्दा अपेक्षा न करता मुलाचे लग्न करुन हुंडाबंदीचा उपक्रम राबविला. अहिल्यादेवींना एका उपवर मुलींचे वडील येऊन भेटले आणि त्यांच्या पायाशी स्पर्श करुन म्हणाले, ‘मातोश्री आम्ही गरीब आहोत, जो-तो हुंडा मागतो. मुलींच्या लग्नाची चिंता आहे.’ हे ऐकून अहिल्यादेवी ‘स्त्रीच्या कौतुकाची नुसती सोंगं. तिला देवी म्हणावं, लक्ष्मी म्हणावं, देवी आदि शक्ती म्हणावं आणि तिच्या गृह प्रवेशाचे पैसे घ्यावे. सोने, वस्तू, मानपान ओरबडावा हे कसले खेळ? नुसता खोटा देखावा. असे उद्गारल्या आणि त्यांनी त्वरीत कारभारी हरी मुकुंद यास बोलावून राज्यात हुंडाबंदीचा आदेश काढला. ^अहिल्यादेवींच्या काळात पुरुषप्रधान संस्कृती होती. तेथे स्त्रीला कसलेही स्थान, अधिकार नव्हते. तरीही अहिल्यादेवींनी स्त्री अस्मितेचा आणि स्त्री स्वातंत्र्याचा हुंडा बंदी पुकारला आणि तो अंमलात आणला. ‘राज्यकाभार पुरुषांनीच का करावा? स्त्रीयांनी का करु नये? मी स्त्री असले तरी राज्यकारभार करण्यास समर्थ आहे.’ असे म्हणत त्यांनी पुरुषी अहंकाराला जागच्या जागी थंड केले. स्त्री अस्मियतेचा आणि स्त्री स्वातंत्र्याचा ललकार पुकारला. अशा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवींना त्यांच्या जन्मदिनी कोटी कोटी प्रणाम ! हरिभाऊ कोळेकर, साहित्यिक संस्कृतीच्या काळात महिलांना स्थान

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर