ब्रेकिंग न्यूज
⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News
SP News Maregaon

बारावी इंग्रजीच्या पेपरला सामूहिक कॉपी:कन्नडच्या जैतापूर प्रकरणी 19 जण निलंबित; झेडपीचे 3 शिक्षक, 2 केंद्रसंचालकासह 17 पर्यवेक्षकांवर कारवाई

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जैतापूर (ता. कन्नड) येथील राष्ट्रीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये सामूहिक कॉपी केल्याप्रकरणी शिक्षण विभागाने 19 जणांना निलंबित केले आहे. त्यात झेडपीचे 3 शिक्षक, 2 केंद्रसंचालकासह 17 पर्यवेक्षकांसह बैठ्या पथकाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे यात खासगी शिक्षणसंस्थांच्या कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचे समजते. केंद्रावर 14 वर्गांमध्ये 370 विद्यार्थी होते. सामूहिक कॉपी प्रकरणी दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निर्णय बोर्ड घेईल, अशी माहिती माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी अश्विनी लाठकर यांनी काल दिली होती. त्यानंतर आज ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष अनिल साबळे यांनी दिली. सीसीटीव्हीत झाले चित्रण परीक्षा सुरू असताना विद्यार्थ्यांना जागेवरून उठण्याची परवानगी नसते. मात्र काही विद्यार्थी वर्गात कॉपीसाठी फिरताना दिसत होते. एका बाकावर 1 विद्यार्थी असा नियम असताना जैतापूरच्या राष्ट्रीय कनिष्ठ विद्यालयात एका बाकावर दोन-तीन विद्यार्थी कॉपीसाठी बसले होते. ज्या पर्यवेक्षकांवर कॉपी रोखण्याची जबाबदारी असते तेच विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास मदत करत असल्याचे सीसीटीव्हीत चित्रित झाले आहे. काल प्रस्ताव केले होते दाखल जैतपूर सामूहिक कॉपी प्रकरणात केंद्र संचालकासह एकूण 19 जणांविरुद्ध काल कारवाई प्रस्तावित करण्यात आली होती. यामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी असलेले पर्यवेक्षक, शिक्षक व बैठे पथकातील अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाचे प्रस्ताव दाखल करण्यात आले होते. तसेच, इतर संस्थांशी संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात त्यांच्या संस्थेमार्फत संस्थांतर्गत शिस्तभंगात्मक कार्यवाही करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते. या परीक्षा केंद्रावरील संपूर्ण स्टाफही बदलण्यात आला आहे. भविष्यात ही परीक्षा अत्यंत पारदर्शक, शिस्तबद्ध आणि नियमांनुसार घेणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 23 जणांविरुद्ध गुन्हा बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला जैतापूर येथील राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालयात सामूहिक कॉपी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत विद्यार्थी दिसले होते. या प्रकरणी केंद्र संचालक व पर्यवेक्षकासह 23 जणांविरुद्ध देवगाव रंगारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आज ही कारवाई करण्यात आली. जैतापूर केंद्रावरील सर्व कर्मचारी तडकाफडकी बदलण्यात आले आहेत. यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केंद्र संचालक पी. सी. आव्हाळे, पर्यवेक्षक आर. के. दरे, पी. ए. लहाने, संजय कवे, एस. टी. घुले, पंढरीनाथ भिंगारे, डी. जे. गायकवाड, कैलास सोनवणे, श्रावण साळवे, कचरू राठोड, भाऊसाहेब शेळके, एकनाथ पेर, भानुदास सोनवणे, रामदास सातदिवे, रावसाहेब लिहणार, नथू निर्मळ, रमेश धुमाळ, हुकूमसिंह चांदवाडे, एफ. व्ही. चंदवाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर