ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

मूर्तिजापुरात आपत्ती व्यवस्थापनासाठी यंत्रणांना सतर्कतेचे प्रशासनाचे आदेश:पावसाळ्यापूर्वी प्रशासन सज्ज, उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतला आढावा‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मूर्तिजापूर आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मूर्तिजापूर येथील नगरपरिषद सभागृहात उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व तयारी आढावा सभा नुकतीच संपन्न झाली. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी पूर्वतयारीचा आढावा बैठकीत घेण्यात आला. या महत्त्वपूर्ण बैठकीस शहर, ग्रामीण व माना पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्यासह कृषी, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, पाटबंधारे आणि जलसंधारण विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी व विविध यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व यंत्रणांनी मिळून चोख उपाययोजना कराव्यात, यावर बैठकीत एकमत झाले. नियंत्रण कक्ष अद्ययावत ठेवण्याचे निर्देश बैठकीत अतिवृष्टी, पूरस्थिती, नाल्यांची स्वच्छता, धोकादायक व शिकस्त इमारतींचा प्रश्न, सुरळीत वीज पुरवठा आणि आरोग्य सेवा यांवर सविस्तर चर्चा झाली. साहित्य उपलब्धता, निवारा केंद्रांची तयारी आणि तत्पर संपर्क व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. उपविभागीय अधिकाऱ्यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहून त्वरित प्रतिसाद देण्याचे निर्देश दिले. नियंत्रण कक्ष २४ तास अद्ययावत ठेवावेत व यंत्रसामग्री सज्ज ठेवावी, असे निर्देश तहसीलदार शिल्पा बोबडे यांनी दिले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर