ब्रेकिंग न्यूज
10 सेकंदांचा थरार! लिफ्टमध्ये वर जाताना अचानक बसले भूकंपाचे धक्के, नाशिकमधील घटना CCTV कॅमेऱ्यात कैद CRIME : गँगवॉरने नांदेड हादरलं! दोघं दबा धरून बसले, गाडी पेट्रोल पंपावर वळली अन् सांडला रक्ताचा सडा; इंद्रज… Ravindra Jadeja : ड्रेसिंग रूमममध्ये रविंद्र जडेजाने असं काय केलं की, गंभीर खळखळून हसला; Video आला समोर मारेगावच्या हेमंतची UPSC-CAPF मध्ये दमदार भरारी! Success Story : नोकरीच्या मागे न लागता घेतला व्यवसायाचा निर्णय, बंदिस्त शेळीपालन केलं यशस्वी, वर्षाला 7 लाख… पश्चिम बंगालच्या उपसागरात घोंगावतंय मोठं संकट, विदर्भ-मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट, हवामान विभागाने … CRIME : बालपणापासून जिवाभावाच्या मैत्रिणी अन् एकत्र मृत्यूला कवटाळलं! नातेवाईकांकडे दुपारी जेवण अन् 4 तासात… Eknath Shinde: सुप्रीम कोर्टात सुनावणी अन् एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत! पीएम मोदींची घेणार भेट, बैठकीचं कारण … IND vs SL : श्रीलंका क्रिकेटचा टीम इंडियासोबत ‘गोलीगत धोका’! गंभीरच्या लगेच लक्षात आला शातीर डाव, शुभमनचाही… Chandrpur: हॉस्टेलमध्ये पाचवीमध्ये शिकणाऱ्या 2 भावांवर मित्रांकडून अनैसर्गिक अत्याचार, चंद्रपूर हादरलं
SP News Maregaon

हातात भाजपचे तिकीट, पण उमेदवाराने भरला नाही अर्ज:मुंबईत भाजपला निवडणुकीपूर्वी एका जागेचा फटका; नेमके काय घडले?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


हातात भाजपचे तिकीट असूनही एका उमेदवाराला आपली उमेदवारी दाखल करता आली नसल्याची विचित्र गोष्ट मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 212 मध्ये घडली आहे. यामुळे भाजपला निवडणुकीपूर्वीच एका जागेचा फटका सहन करावा लागला आहे. वेळ खरोखरच फार मौल्यवान असतो. तो कुणासाठीही थांबत नाही. याची अनेकांना प्रचिती येते. हीच प्रचिती मंगळवारी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या एका उमेदवाराला आली. मंगळवारी महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यासाठी सर्वच उमेदवारांची ठराविक वेळेत अर्ज भरण्यासाठी पळापळ सुरू होती. पण वॉर्ड क्रमांक 212 मधील भाजपच्या उमेदवार मंदाकिनी खामकर यांना 15 मिनिट उशीर झाल्यामुळे हातात भाजप सारख्या बलाढ्या पक्षाचा फॉर्म असूनही तो भरता आला नाही. वेळेचे व्यवस्थापन करण्यात चूक अन् जन्माची अद्दल त्याचे झाले असे की, भाजपने मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 212 मध्ये मंदाकिनी खामकर यांना उमेदवारी दिली होती. पक्षाने वेळेत त्यांना एबी फॉर्मही दिला होता. पण निवडणूक अर्जासोबत जोडाव्या लागणाऱ्या नवीन बँक खात्याच्या कामासाठी त्या बँकेत गेल्या होत्या. दुर्दैवाने बँकेतील तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. बँकेतील काम आटोपून मंदाकिनी खामकर जेव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचल्या, तेव्हा उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली होती. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार, अर्ज भरण्याची अंतिम मुदत मंगळवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच होती. पण मंदाकिनी खामकर 15 मिनिटे उशिरा प्रभाग कार्यालयात पोहोचल्या. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपली असून, खिडकी बंद झाली आहे, असे अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. त्यामुळे हातात भाजपसारख्या बलाढ्य पक्षाचे तिकीट असूनही त्यांना वेळ पाळण्यात झालेल्या अक्षम्य चुकीमुळे निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडावे लागले. यामुळे मुंबई महापालिकेच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपला निवडणुकीपूर्वीच एका जागेचा फटका सहन करावा लागला. सध्या वॉर्ड क्रमांक 212 मध्ये भाजपचा एकही अधिकृत उमेदवार नाही. त्यामुळे पक्षापुढे कुणाला पाठिंबा द्यायचा? हा पेच उभा टाकला आहे. दरम्यान, वेळ फार मौल्यवान असते, ती कुणासाठीही थांबत नाही हे या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. हे ही वाचा… ठाकरे गटाने मनसेचा आवळा देऊन कोहळा काढला:भाजपचा आरोप; काँग्रेसने वंचितचे जे केले तेच उद्धव यांनी राज ठाकरेंचे केल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला आवळा देऊन कोहळा काढल्याचा आरोप सत्ताधारी भाजपने केला आहे. ठाकरे गटाने सन्मानाच्या नावाने राज ठाकरेंना घरी बोलावले व तसेच त्यांच्या घरी फेऱ्याही मारल्या. पण प्रत्यक्षात 50 जागांवरच मनसेची बोळवण केली, असे भाजपने म्हटले आहे. वाचा सविस्तर

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर