ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

लोहाऱ्यात दीड लाखांची मोटारसायकल जाळली:घटनास्थळी आढळली माचिस व प्लास्टिक बाटली‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील दुर्गा माता चौकात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास एका घराशेजारी उभी केलेली अंदाजे दीड लाख रुपये किमतीची “टीव्हीएस रायडर’ मोटरसायकल अज्ञात व्यक्तीने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या समाजकंटकाच्या कृत्यामुळे संपूर्ण वाहन जळून खाक झाले असून, परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे. लोहारा येथील रहिवासी रोहन उमेश पालीवाल यांच्या मालकीची मोटरसायकल (क्रमांक एमएच १९, ९९०४) नेहमीप्रमाणे त्यांच्या घराशेजारील जागेत उभी केलेली होती. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने ती जाळून टाकली. विशेष म्हणजे, मोटारसायकल जळालेल्या ठिकाणापासून काही अंतरावरच एक माचिस आणि प्लास्टिकची बाटली आढळून आली आहे. यावरून कोणीतरी जाणीवपूर्वक पेट्रोल किंवा ज्वलनशील पदार्थ टाकून हे कृत्य केल्याचा संशय बळावला आहे. दुर्गामाता चौकासारख्या भरवस्तीच्या भागात अशा प्रकारे वाहन जाळण्याचा हा पहिलाच प्रकार घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. “भरवस्तीत गाड्या जाळणे हा प्रकार अत्यंत भयावह असून, पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी,” अशी मागणी वाहनधारक रोहन पालीवाल व ग्रामस्थांनी केली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर