ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

डॉक्टर संग्राम पाटील यांची मुंबई विमानतळावर पुन्हा चौकशी:लंडनला जाण्यापासून रोखले, विमान सुटले; 10 तारखेलाही झाली होती चौकशी

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरीक डॉक्टर संग्राम पाटील यांना आज पुन्हा मुंबई विमानतळावर चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. या चौकशीच्या फेऱ्यात त्यांचे लंडनला जाणारे विमान सुटल्यामुळे त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला आहे. डॉक्टर संग्राम पाटील हे मूळचे जळगावचे आहेत. ते सध्या ब्रिटनमध्ये स्थायिक आहेत. गत 10 जानेवारी रोजी ते आपल्या कुटुंबासह मायदेशी परतले होते. त्यानंतर मुंबई विमानतळावर त्यांना चौकशीच्या नावाखाली दिवसभर बसवून ठेवण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी उशिरा त्यांची सुटका करण्यात आली होती. सोशल मीडियावरील एका पोस्टच्या संदर्भात त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. संग्राम पाटील हे भाजप सरकारवरील आपल्या टीकेसाठी ओळखले जातात. त्यातूनच त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप झाला. त्यामुळे त्याचे सोशल मीडियात तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर आज 19 जानेवारी रोजी ते आपल्या कुटुंबासह लंडनच्या दिशेने निघाले होते. पण मुंबई विमानतळावर पुन्हा त्यांना चौकशीला सामोरे जावे लागले. चौकशीच्या गडबडीत लंडनचे विमान सुटले यासंबंधीच्या माहितीनुसार, संग्राम पाटील यांनी आपण 19 जानेवारी रोजी सकाळच्या विमानाने ब्रिटनला परत जाणार असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांना दिली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात जारी करण्यात आलेले लूक आऊट सर्क्युलर मागे घेण्याची ग्वाही दिली होती. पण प्रत्यक्षात वेगळेच चित्र पहावयास मिळाले. संग्राम पाटील आज सकाळी 8 च्या इंडिगोच्या विमानाने ब्रिटनला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचले. पण इमिग्रेशन काउंटरवरच त्यांना थांबवण्यात आले. त्यांना विमानात चढण्यास मज्जाव करण्यात आला. या गडबडीत त्यांचे लंडनचे विमान सुटले. विशेष म्हणजे डॉक्टर संग्राम पाटील यांच्याविरोधात सायबर क्राईम विभागात माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच आधारावर त्यांच्याविरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. संग्राम पाटील यांच्याविरोधातील काय आहे तक्रार? डॉक्टर संग्राम पाटील यांच्यावर भाजप व तिच्या नेत्यांविरोधात सोशल मीडिवर आक्षेपार्ह लिखान केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. भाजप महाराष्ट्र प्रदेशचे सोशल मीडिया सहसंयोजक निखील श्यामराव भामरे यांनी यासंबंधीची तक्रार पोलिसांत दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार संग्राम पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पण आता डॉक्टर संग्राम पाटील यांना परदेशात जाण्यापासून रोखण्यात आल्याने हा विषय अधिकच गंभीर बनला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर