ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

सायकलीवर फिरून गुलाबरावांनी खेड्यापाड्यात शिवसेना वाढवली:पाळधीत आयाेजित जाहीर सभेत खासदार डाॅ. श्रीकांत शिंदेंचे गाैरवाेद‌्गार‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी परखड वक्तृत्वाच्या बळावर बैलगाडी, सायकलीने प्रवास करून खान्देशात शिवसेना वाढवली. शब्दाला जागणारा नेता अशी त्यांची ख्याती आहे. राज्यभर राबवलेल्या जलजीवन अभियानाने ‘पाणीवाले बाबा’ असे नामाभिधान त्यांना मिळाले असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नमूद केले. धरणगाव तालुक्यात पाळधी येथे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अभीष्टचिंतन निमित्त शुक्रवारी रात्री आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. गुलाबराव हे केवळ मंत्री नसून खान्देशच्या जनतेच्या हृदयात घर केलेले लोकनेते आहेत. ते शिवसेनेचा ढाण्या वाघ, धडाडणारी तोफ व बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा ठेवणारे शिवसैनिक आहेत, असे खासदार शिंदे म्हणाले. आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे यांचीही भाषणे झाली. झेडपीचे माजी सदस्य प्रताप पाटील यांच्या मार्गदर्शनात सभेचे अचूक नियोजन केलेले होते. यांची होती उपस्थिती सभेच्या व्यासपीठावर आमदार किशोर पाटील (पाचोरा), आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे (चोपडा), खासदार मिलिंद देवरा (मुंबई), आमदार मंजुळा गावित, शिवसेनेचे जळगाव जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, रावसाहेब पाटील, माजी खासदार उन्मेष पाटील, माजी सभापती मुकुंद नन्नवरे यांच्यासह पदाधिकारी व जीपीएस परिवाराचे सदस्य या वेळी उपस्थित होते. आरोग्य सेवा : महिलांमधील स्तनाच्या कर्करोगाच्या प्राथमिक तपासणी आणि निदानासाठी विशेष मोबाइल ‘मॅमोग्राफी व्हॅन’ सुरू करण्यात येईल. जळगाव ग्रामीण मतदारसंघात गावोगावी ही व्हॅन फिरेल. तपासणी, निदान आणि उपचार ही सर्व जबाबदारी जीपीएस परिवार पार पाडेल. जलसंवर्धन : जळगाव ग्रामीण मतदारसंघात ४६० किलोमीटर नाला खोलीकरणाचे काम सीएसआरच्या माध्यमातून सुरू आहे. ४० किलोमीटरचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. वर्षभरात भूजलपातळी वाढण्यासाठी मदत होईल. महाराष्ट्रात हा प्रकल्प पथदर्शी ठरावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. राजकारण : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी गुलाब ते गुलाबराव अशी ओळख दिली. मी मुंबईच्या भरवशावर नव्हे तर तळागाळातील जनतेच्या विश्वासावर राजकारण करतो आहे. ‘पाणी वाहतं ठेवलं पाहिजे, साचलं की डास वाढतात व आरोग्य धोक्यात येते’ हा विचार समोर ठेवला आहे. फिरकी : माणूस साठीनंतर ज्येष्ठ मानला जातो. मात्र, मी अजून ५८ वर्षांचा आहे. शर्यत लावली तर आजही आमदार किशोर पाटील यांच्या बरोबरीने न थांबता पळू शकतो. कधी काळी पाळधीच्या ओट्यावर पाच-पन्नास लोकांसह सभा व्हायची. तीस वर्षांत हे चित्र बदलले. आज मैदान अपूर्ण पडते आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर