ब्रेकिंग न्यूज
⚡ मध्य रेल्वेवर पुन्हा खोळंबा होणार! कसारा मार्गावर 12 दिवसांचा ब्लॉक, वेळापत्रक पाहूनच करा प्रवासाचं नियोजन ✦ ⚡ 10 वर्षांपूर्वीचा निर्णय ठरला फायद्याचा, ढोबळी मिरचीच्या लागवडीतून वर्षाला 7 कमाई, शेतकऱ्याने सांगितला यशाच… ✦ ⚡ दारू प्यायला पैसे दिले नाहीत, मित्रच बनला सैतान, ब्लेड काढलं अन्…, रात्रीच्या घटनेनं छ. संभाजीनगरात खळबळ ✦ ⚡ मुंबईत एन्ट्री महागली! आता 5 नाक्यांवर मोजावे लागणार जादा पैसे, ‘या’ वाहनांना टोलमाफी ✦ ⚡ जिच्यावर प्रेम तिच्यासोबत साखरपुडा झाला, पण तिच्या आईनं दगा दिला, सोलापुरात 21 वर्षीय तरुणाचं टोकाचं पाऊल ✦ ⚡ Rabi Crops MSP: मोदी सरकारचा मोठा निर्णय, गहू आणि हरभऱ्यासह 6 पिकांच्या किंमतीत मोठी वाढ ✦ ⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू
SP News Maregaon

खानापुरात केला जातोय आठ दिवसांनी अशुद्ध पाणीपुरवठा:जलवाहिनीतून निघालेल्या पक्ष्याची पंखे थेट बीडीओंना दाखवली‎

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मोर्शी लगतच असलेल्या खानापूर गावात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना दर आठ ते दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. मात्र तोही अशुद्ध असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. माजी उपसरपंच संदीप भदाडे यांच्या नेतृत्वात शेकडो गावकरी गटविकास अधिकारी स्वप्निल मगदूम यांच्या हजेरीत ग्रामपंचायत कार्यालयात येऊन धडकले. यावेळी त्यांना पाण्याच्या पाईपलाइनमधून निघालेला पक्षी व त्याची पंखे दाखवून, हाच का तो शुद्ध पाणीपुरवठा, असा सवाल विचारण्यात आला. ग्रामस्थांच्या या आक्रमक भूमिकेमुळे येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खानापूरपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर अप्पर वर्धा धरण (नळ दमयंती सागर) असूनसुद्धा खानापूर गावातील महिला, शेतकरी, मजूर व शाळकरी विद्यार्थ्यांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. गावकऱ्यांच्या मते, यापूर्वी प्रशासनाच्यावतीने गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरी अधिग्रहित करून खानापूर येथील घरोघरी पाणीपुरवठा केला जात होता. परंतु आता ग्रामपंचायतच्या शून्य नियोजनामुळे खानापुरवासियांना पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे. गावातील नागरिकांना, शाळकरी विद्यार्थ्यांना, पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. मिळेल तेथून पाणी आणावे लागते. पिण्याच्या पाण्याची कॅन विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे. या गंभीर समस्येबाबत माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप भदाडे यांनी खासदार अमरभाऊ काळे यांना माहिती दिली. खासदार महोदयांनी लगेच बीडीओ यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. त्यामुळे गटविकास अधिकारी ग्रामपंचायत कार्यालय, खानापूर येथे दाखल झाले. येथे पोहोचताच गावकऱ्यांनी एकच हल्लाबोल करून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. खानापूरचा पाणीप्रश्न तातडीने सोडविण्यात यावा. अन्यथा यापुढे रस्त्यावर उतरून मोठे जनआंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांच्यावतीने देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी विजय ठाकरे, अन्सार मन्सुरी, मंगेश बोराळकर, हरी खडसे, दिनेश पानपगार, प्रदीप ठाकरे, योगेश ढोमणे, संतोष तिहीले, तेजस भदाडे, गोकुल ठाकरे यासह शेकडो ग्रामवासी उपस्थित होते. कर न भरण्याचा निर्धार एकतर नागरिकांना दहा-दहा दिवस पाण्याची वाट पहावी लागते. ही बाब अत्यंत लाजिरवाणी आहे. त्यामुळे विकासाच्या घोषणा नको. खानापुरला हक्काचे पाणी द्या, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कर भरणाऱ्या जनतेला हक्काचे पाणी मिळत नसेल तर यापुढे कोणत्याही प्रकारचा कर भरणार नाही, अशी भूमिकादेखील गावकऱ्यांनी घेतली आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर