ब्रेकिंग न्यूज
महाआवास अभियानात प्रतीक्षा गाडगे यांची दमदार कामगिरी Shravan Astrology: श्रावणात ग्रह फिरले, कुणाला संधी तर कुणावर संकट. मेष ते मीन राशीवाले काय काळजी घ्याल? खर्च कमी अन् मिळेल भरघोस उत्पन्न, गट शेती ठरेल फायद्याची, कृषी तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला, Video Agniveer-Bharti-2026: भावांनो, लागा तयारीला…! कोल्हापुरात 14 सप्टेंबरपासून अग्निवीर भरती, कुणाला संधी? CRIME : रात्री बायकोसोबत ‘आखाड पार्टी’ केली अन् सकाळी शुद्धीत येताच डोक्यात कुकरचं झाकण घालून संपवलं! शिक्ष… Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम
SP News Maregaon

मुलगा हाच वंशाचा दिवा ही मानसिकता बदला:निफाड येथील जनजागृती कार्यक्रमात डॉ. सुधा कांकरिया यांचे आवाहन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


‘मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आणि मुलगी म्हणजे पराया धन’ ही समाजातील जुनी मानसिकता बदलल्याशिवाय स्त्री-पुरुष समानता शक्य नाही. मुलींच्या जन्माचे स्वागत करून त्यांना शिक्षण, आरोग्य आणि विकासाच्या समान संधी देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पीसीपीएनडीटी स्टेट सुपरव्हिजरी बोर्ड सदस्य तथा ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ चळवळीच्या डॉ. सुधा कांकरिया यांनी केले. उपजिल्हा रुग्णालय निफाड, ग्रामीण रुग्णालय लासलगाव व ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव बसवंत यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती निफाड येथे ‘स्त्री जन्माचे स्वागत करा’ या विषयावर विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुकर शेलार होते. कार्यक्रमाची सुरुवात धन्वंतरी मातेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. उपजिल्हा रुग्णालय निफाडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजीव तांभाळे यांनी प्रास्ताविक केले. यानंतर डॉ. सुधा कांकरिया यांनी मुलींचे शिक्षण, सक्षमीकरण, बालविवाह प्रतिबंध, गर्भलिंग निदानावरील कायदेशीर बंदी तसेच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचे महत्त्व स्पष्ट केले. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ती, सुपरवायझर तसेच आरोग्य व शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांना माहितीपत्रकांचे वितरण करण्यात आले. स्त्री जन्माच्या स्वागतासाठी ११ कलमी कृती कार्यक्रम सादर करताना कन्याजन्म आनंद सोहळे, मुली असलेल्या कुटुंबांचा सन्मान, सामुदायिक डोहाळे जेवण, लग्नात स्त्री जन्म स्वागताचा आठवा फेरा आदी उपक्रम राबविण्याचे आवाहन करण्यात आले. सोनोग्राफी मशीनचे महत्त्व आणि त्याच्या योग्य वापराबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास डॉ. बाळकृष्ण अहिरे, डॉ. नागनंदा मगरे, सागर कुंदे पाटील, दिलीप आबा कापसे, सुवर्णा लुक्कड आदींची उपस्थिती होती. कन्याजन्म आनंद सोहळ्यांचे आयोजन करावे, मुली असलेल्या कुटुंबांचा सन्मान करावा, ग्रामसभा व वॉर्ड सभांमधून स्त्री जन्म स्वागताचे ठराव घ्यावेत, सामुदायिक डोहाळे जेवणाचे आयोजन करून जनजागृती करावी, लग्नसमारंभात ‘स्त्री जन्म स्वागताचा आठवा फेरा’ घेण्याची परंपरा रुजवावी, मुलींच्या शिक्षण, आरोग्य आणि सक्षमीकरणाला प्राधान्य द्यावे, समाजातील स्त्री-पुरुष भेदभावाची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करावेत असा समावेश या कृती कार्यक्रमात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर