ब्रेकिंग न्यूज
उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा … Lumpy Skin Disease : जनावराला ताप अन् शरीरावर सूज, असू शकतो लम्पी आजाराचा धोका, अशी घ्या काळजी Video पुणेकर वाहतूक कोंडीचं टेन्शन सोडा! पाषाण ते कोथरूड अवघ्या 10 मिनिटांत, नेमका प्लॅन काय? ‘ओम नम: शिवाय’चा जप करत पोरानं मैदानात घातला तांडव! मॅच जिंकून दिली, कोण आहे वंश बेदी? पाहा Video Raj Thackeray News | तिसरी मुंबई कुणासाठी? राज ठाकरेंचा सवाल! | Special Report
SP News Maregaon

रायगडमध्ये शिंदेसेना-काँग्रेस एकत्र; म्हसळा नगरपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता उलथली:नगराध्यक्षांच्या केबिनमधून हटवला तटकरेंचा फोटो

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायतीत मोठा राजकीय उलटफेर झाला असून शिंदे गटाची शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारत नगरपंचायतीवर भगवा फडकवला. गेली दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या म्हसळा नगरपंचायतीत आता सत्तांतर झाल्याने खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांना मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. या निकालामुळे रायगडमधील आगामी राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. म्हसळा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीत 17 पैकी 9 नगरसेवकांचा पाठिंबा मिळवत शिंदे गटाच्या शिवसेनेने सत्ता काबीज केली. शिवसेनेकडून जंजिरकर हे उमेदवार रिंगणात होते, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील शेडगे यांनी निवडणूक लढवली. मात्र, मतदानात शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाल्याने राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला. या विजयामागे मंत्री भरत गोगावले यांची रणनीती प्रभावी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. म्हसळा नगरपंचायतीतील सत्तांतरानंतर सर्वाधिक चर्चेत राहिली ती नगराध्यक्षांच्या केबिनमधील बदललेली छायाचित्रे. सत्ता स्थापन होताच नव्या नगराध्यक्ष आणि शिवसेना नगरसेवकांनी नगराध्यक्षांच्या दालनातील खासदार सुनील तटकरे यांचा फोटो हटवला. त्याजागी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे फोटो लावण्यात आले. या घटनेची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, हा बदल केवळ सत्तेचा नाही तर राजकीय संदेश असल्याचे बोलले जात आहे. या निकालानंतर म्हसळा परिसरात शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी विजय साजरा करत फटाके फोडले. विशेष म्हणजे, रायगडमध्ये काँग्रेस आणि शिंदे गट एकत्र आल्याने नवे राजकीय समीकरण तयार झाल्याचे चित्र दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही या आघाडीचा परिणाम पाहायला मिळू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. श्रीवर्धन मतदारसंघात शिंदे गटाची ताकद वाढत असल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अदिती तटकरे यांच्यासाठीही मोठा धक्का दरम्यान, या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या नगरसेवकांना व्हीप जारी केला होता. पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. तरीदेखील सत्ता वाचवण्यात राष्ट्रवादीला यश आले नाही. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी आणि स्थानिक पातळीवरील बदललेले राजकीय समीकरण याबाबत आता चर्चा रंगू लागल्या आहेत. म्हसळा नगरपंचायतीतील हा पराभव अदिती तटकरे यांच्यासाठीही मोठा धक्का मानला जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर