ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

मनमाडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुग्धाभिषेक:शिवभक्तांची गर्दी; विविध संघटनांकडून अभिवादन व पुस्तकांचे वितरण‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला दुग्धाभिषेक, पूजन आणि महाआरती करून शिवरायांना अभिवादन करण्यात आले. नगराध्यक्ष योगेश पाटील यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला. मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि शिवराज्याभिषेक दिन चिरायू हो, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. मयूर बोरसे, परेश राऊत, विनय आहेर आदींसह प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. सुनील बिडगर यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व उपस्थितांना सांगितले. कार्यक्रमाला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, मराठा समाज बांधव, नगरसेवक, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले होते. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी, मनमाड शहराच्या वतीनेही शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. शहराध्यक्ष विलास आहिरे व शहर उपाध्यक्ष सागर गाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पक्षाच्या वतीने कॉ. गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर