ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

NEET प्रश्नपत्रिकेची पहिली कॉपी नाशिकमधून बाहेर पडल्याचा संशय:नाशिकमधूनच प्रिंट आणि वितरण; नाशिक ते हरियाणा पेपरफुटीचं जाळं

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


देशातील वैद्यकीय शिक्षणासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी NEET परीक्षा यंदा मोठ्या वादात सापडली आहे. 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून घेण्यात आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. 22 लाख विद्यार्थ्यांनी दिलेल्या या परीक्षेतील पेपरफुटीचे धागेदोरे आता समोर येऊ लागले असून, या प्रकरणाचा पहिला संबंध नाशिकशी जोडला जात आहे. तपासातून समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रश्नपत्रिकेची पहिली कॉपी नाशिकमधून बाहेर पडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरातील शिक्षण व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणात नाशिकचे कनेक्शन समोर येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे नाशिकमधून एकाला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी याला अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही. यातील पेपर हे नाशिकमधूनच प्रिंट करण्यात आले होते, असाही संशय व्यक्त केला जात आहे. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, नाशिकमध्ये बाहेर पडलेली प्रश्नपत्रिका पुढे हरियाणात पोहोचवण्यात आली. हरियाणामध्ये त्या प्रश्नपत्रिकेचे दहा वेगवेगळे सेट तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. यानंतर हे पेपर बिहार, आंध्र प्रदेश तसेच जम्मू-काश्मीरपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परीक्षा प्रक्रियेत सहभागी असलेल्या संस्था, एजन्सी आणि सुरक्षा यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पेपर लीक होण्याची साखळी इतक्या मोठ्या प्रमाणात कशी कार्यरत होती, याचा शोध आता केंद्रीय तपास यंत्रणा घेत आहेत. या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे म्हणजेच सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. तपासात आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, जयपूरमधून अटक करण्यात आलेला मनीष नावाचा संशयित या संपूर्ण पेपरफुटीचा सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तपास अधिकाऱ्यांच्या मते, प्रश्नपत्रिका अधिकृतरीत्या छापली जाण्यापूर्वीच संभाव्य प्रश्नांची माहिती त्याने मिळवली होती. त्यानंतर संगनमताने प्रश्नपत्रिका बाहेर काढून ती विविध राज्यांमध्ये पोहोचवण्यात आल्याची शक्यता तपासली जात आहे. या संपूर्ण नेटवर्कमध्ये आणखी किती जण सहभागी आहेत, याचाही शोध सीबीआय घेत आहे. दरम्यान, परीक्षा रद्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम आणि मानसिक तणाव निर्माण झाला आहे. NEET परीक्षेसाठी देशभरातील विद्यार्थ्यांनी वर्षभर कठोर परिश्रम घेतले होते. अनेक विद्यार्थी कोचिंगसाठी आपल्या गावांपासून दूर मोठ्या शहरांमध्ये राहात होते. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर अनेक जण सुटकेचा निश्वास टाकत घरी परतले होते. काही विद्यार्थी कुटुंबासोबत सुट्ट्यांसाठी बाहेर गेले होते. मात्र अचानक परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांसमोर पुन्हा तयारी, अभ्यास आणि नव्या तारखेची चिंता उभी राहिली आहे. परीक्षा केंद्रेच कायम राहतील नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून नव्या परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नसणार असून, 3 मे रोजी निश्चित करण्यात आलेली परीक्षा केंद्रेच कायम राहतील, अशी माहिती देण्यात आली आहे. नव्या परीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नसले तरी विद्यार्थ्यांना नवीन ओळखपत्र दिले जाणार आहे. केंद्र सरकार आणि एनटीएकडून विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर