ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

सगळेच पाकिस्तानी, मग भारतीय फक्त भाजपवालेच का?:’CJP’च्या अभिजीत दिपकेचा सवाल, पुढील वाटचालीवरही केले भाष्य

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अभिजीत दिपके पंतप्रधानांवर काही बोलत नाही, असा आरोप केला जात आहे. यावर प्रश्न विचारला असता दिपके म्हणाला, पंतप्रधानांनी राजीनामा घेतला पाहिजे, हे आम्ही आधीपासून म्हणत आहोत. जर शिक्षा मंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नसेल तर यात पंतप्रधानांची जिम्मेदारी आहे. जर ते रशिया आणि युक्रेनचे युद्ध थांबवू शकतात तर पेपर लीक थांबवू शकत नाहीत का? असा सवाल दिपकेने केला. इथून पुढे जे काही सरकारविरोधी मुद्दे असतील ते उपस्थित करणार का? या प्रश्नावर उत्तर देताना अभिजीत दिपके म्हणाला, जे जे युवकांचे मुद्दे आहेत, मग तो शहरी भागातला असो, ग्रामीण भागातला असो किंवा शेतकरी युवक असो किंवा कामगार युवक असो, त्या सगळ्यांचे मुद्दे उपस्थित करणार आहे. एकूण राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना अभिजीत दिपके म्हणाला, राजकीय परिस्थिती काय आहे ते तर तुम्ही बघतच आहात. एका सटायरमधून जन्मलेल्या पक्षाला एवढे समर्थन भेटत आहे ते कशामुळे मिळत आहे? कारण जेवढे राजकीय पक्ष आहेत किंवा सरकार आहे, त्यांच्याकडून या युवकांना काहीच अपेक्षा राहिलेल्या नाहीत. राजकीय पक्षाची नोंदणी होणार का? अभिजीत दिपके म्हणाला, आता त्या सगळ्या गोष्टींना वेळ आहे. मी कालच इंडियामध्ये आलो आहे. 15 दिवसांपूर्वीच हे सगळे सुरू झालेले आहे. त्यामुळे राजकीय पक्षाची नोंदणी करणार की नाही यावर बोलणे खूप लवकर असेल. आम्हाला ज्यांनी सपोर्ट दिला आहे, ज्यांनी आमची मेंबरशिप घेतली आहे, त्या लोकांशी आम्ही संवाद करू आणि त्यांचे जे काही सजेशन, आयडियाज असतील त्यानुसार आम्ही आमचा पुढचा निर्णय घेऊ. या देशात तुम्ही कोणाला कोणाला पाकिस्तानी म्हणणार? अभिजीत दिपकेवर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी टीका करत पाकिस्तानी असल्याचे देखील म्हटले होते. यावर बोलताना दिपके म्हणाला, माझ्यावर ज्या टीका झाल्या त्या झाल्या. आज मी तुमच्यासमोर बसलो आहे. भारतात आहे. काल मी प्रदर्शन केले. मग तुम्ही एका पाकिस्तानीला दिल्लीत प्रदर्शन करू दिले, असे म्हणायचे आहे का तुम्हाला? असा सवाल दिपकेने उपस्थित केला. तसेच पुढे बोलताना अभिजीत दिपके म्हणाला, माझ्यावर टीका केली ते ठीक आहे. पण तुम्ही एका 17 वर्षाच्या वेदांतला पाकिस्तानी म्हणताय? तो एक सीबीएसईचा विद्यार्थी आहे. जी मेन स्ट्रीम मीडिया आहे त्यांनी त्याला पाकिस्तानी म्हटले आहे. जी मुलगा 17 वर्षांचा आहे, त्याचे काम एकच होते की अभ्यास करायचा आणि परीक्षा द्यायची. त्याने परीक्षा दिली, त्याला जेव्हा समजले की त्याची मार्कशीट चुकीची चेक झाली. तो कारभार त्याने उघडकीस आणला आणि त्याला तुम्ही पाकिस्तानी म्हणता? या देशात तुम्ही कोणाला कोणाला पाकिस्तानी म्हणणार आहे? पत्रकारांना पाकिस्तानी म्हणता, विरोधकांना पाकिस्तानी म्हणता? मग भारतीय आहे कोण? फक्त भाजप आणि आयटी सेलवाले भारतीय आहेत का? कधीपर्यंत चालणार हे? तुम्ही तुमचे काम नीट करा, आम्हाला का बोलायची गरज पडणार आहे? असा सवाल दिपकेने उपस्थित केला. दडपण नाही जिम्मेदारी आहे एवढे मोठे आंदोलन उभे केले आहे, तर काही दडपण आहे का? असा प्रश्न विचारला असता त्यावर अभिजीत दिपके म्हणाला, दडपण नाही, जिम्मेदारी आहे. तसेच मोठ्या लोकांचा प्रतिसाद मिळत आहे का? यावर दिपके म्हणाला, सोनम वांगचूकपेक्षा मोठे कोण असू शकते? विश्वंभर चौधरी, अंदजली दमानिया, प्रशांत भूषण, संजय हेगडे जे सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत, त्यांनी देखील आम्हाला पाठिंबा दर्शवला आहे. आणि विरोधी पक्षांचा कुठलाही संपर्क नसल्याचे दिपकेने स्पष्ट केले आहे. ही एक पॉलिटिकल मुव्हमेन्ट अभिजीत दिपके म्हणाला, ही एक पॉलिटिकलच मुव्हमेन्ट आहे. या देशात प्रत्येक गोष्ट पॉलिटिकल आहे. 5 वर्षातून फक्त एकदा मत देणे म्हणजेच पॉलिटिकल नसते. पॉलिटिक्स म्हणजे तुम्ही पाचही वर्ष ज्याला निवडून आणले आहे, त्याला प्रश्न विचारणे. तर हे आमचे देखील पॉलिटिकलच मुव्हमेन्ट आहे. पुढे बोलताना अभिजीत दिपके म्हणाला, आजचा तरुण आता घाबरणार नाही. मी माझ्या आई-वडिलांना भीती वाटतेच थोडीफार. मी त्यांना सांगतो की घाबरण्याची गरज नाही, आज लाखो तरुण आहेत माझ्यासोबत. काल जंतर-मंतरवर इतकी प्रचंड गर्दी झाली होती. आई-वडील बघत असतील, त्यांना माझा संदेश आहे की, मला माहीत आहे की तुमचे मुलं जेव्हा सरकारला प्रश्न विचारात असतील तेव्हा तुम्हाला भीती वाटत असेल, तुम्ही त्यांना सांगाल की काही बोलू नको, तुला जेलमध्ये टाकतील. आपण प्रश्न विचारात नाही म्हणून पेपरलीक होत आहेत. अनेक गोष्टी घडत आहेत. कॉकरोच जनता पार्टीची विचारधारा कॉंग्रेसशी मिळती-जुळती? कॉकरोच जनता पार्टीची विचारधारा कॉंग्रेसशी मिळती-जुळती असल्याचे कॉंग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या होत्या, यावर उत्तर देताना अभिजीत दिपके म्हणाला, आमचे जे इन्सपिरेशन आहेत, महात्मा गांधी, आंबेडकर, नेहरू आणि भगत सिंह हे आहेत, हीच विचारधारा आमच्या पक्षाची आहे. ही पण बातमी वाचा… दिल्लीत आंदोलनानंतर आपल्या घरी पोहोचले अभिजीत दीपके:म्हणाले- सरकारने ट्रेलर पाहिला कॉकरोच काय करू शकतात, पण गोष्ट संपली नाही कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी रविवारी सांगितले की, परीक्षांमधील गोंधळावरून त्यांचे आंदोलन तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत. वाचा सविस्तर…

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर