ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

रोहित पवारांना खरातविषयी वेगळीच शंका:म्हणाले – अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरातशी जवळीक असणारे कोण कोण आले होते?

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भोंदू अशोक खरात व अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा अप्रत्यक्षपणे संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. अजित पवारांच्या घराबाहेर जादूटोणा केल्याचा आरोप केला जात आहे. असे असेल तर त्या काळात 27 जानेवारीला भोंदू अशोक खरातशी जवळीक असणारे कोण कोण व का आले होते? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व त्यांच्या दोन्ही मुलांना स्वतःची काळजी घेण्याचेही आवाहन केले आहे. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज अजित पवारांच्या निधनापूर्वी त्यांच्या सहयोग सोसायटी परिसरातील निवासस्थानाबाहेर अघोरी पूजेचा प्रकार झाल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्याचा दाखला देत रोहित पवार यांनी भोंदू खरात व अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. ते अमोल मिटकरींचे ट्विट रिट्विट करताना म्हणाले, पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रात भोंदुगिरीला स्थानही नाही आणि त्यावर कोणाचा विश्वासही नाही, परंतु आ. अमोल जी मिटकरी म्हणत असल्याप्रमाणे अजितदादांच्या सहयोग सोसायटी येथील निवासस्थानाच्या बाहेर केलेला जादूटोणा तसेच देवगिरी बंगल्याबाहेर नाशिकच्या भोंदुबाबाबाच्या माध्यमातून जादूटोणा झाल्याची समोर येत असलेली माहिती बघता हे प्रकरण खूपच भयंकर दिसते. नाशिकच्या भोंदूबाबाने हा जादूटोणा केला तर मग या भोंदुबाबाबाला भोंदुगिरीची सुपारी देणारे राजकीय राक्षस कोण? त्यांचा या राक्षसी महत्त्वाकांक्षेचा राजकीय हेतू काय होता? या काळात अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले? 27 जानेवारी रोजी संबंधित लोक देवगिरिवर आले होते का? याचा तपास होणे गरजेचे आहे. मा. सुनेत्राकाकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण आजचं बेभरवशी राजकारण चांगलं राहिलेलं नाही… आता पाहू काय म्हणाले अमोल मिटकरी? तत्पूर्वी अमोल मिटकरी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले होते, ह्या तारखा नीट बघा. 18/19/20 नोव्हेंबर 2025 ! या दिवशी अनुक्रमे शिवरात्री,व अमावस्या होत्या. याच काळात सहयोग सोसायटी परिसरात भिगवण रोडला अघोरी पूजेचा प्रकार केला गेला. लिंगपिसाट भोंदू बाबा कॅ अशोक खरात ह्याचा शिवलिका आश्रम हा भगवान शंकराच्या पूजेचा आहे. ह्या आश्रमात अघोरी पूजा चलायच्या? शिवाय बाबांचे भक्त त्याच्या आदेशावरून राजकीय लाभापायी ह्या पुजा आदेश मानून करू शकतात. मी अजित दादांच्या इतक्या वर्षाच्या सहवासात एक गोष्ट अनुभवली होती दादा अजिबात कर्मकांड मानत नव्हते. अशा थोतांडाना थारा देत नव्हते. मात्र या प्रकरणा अशोक खरात चे VSR कनेक्शन उघड झाले आहे. आता प्रश्न असा आहे की 27 जानेवारीला कार ने पुण्याला जाणारे दादा 28 ला सकाळी VSR ने कुणाच्या सल्ल्यावरून गेले? या भोंदू बाबाचा कोण भक्त होता?या बाबाचे व आश्रमातील पुजाऱ्यांचे 16 नोव्हेंबर ते 31 जानेवारी या दरम्यानचे CDR काढल्यास दादांचा घात कसा झाला हा सगळा चित्रपट स्पष्ट होईल. गुजोबावी धुके की धोका?? अघोरी पूजा कुणाची? पाणी इथे पण मुरतांना दिसतंय, असे ते म्हणाले होते.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर