ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

ठाकुरांच्या 71 मतांवर नजर:ठाणे विधानपरिषद निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा भाव वाढला; मतांसाठी भाजप-शिवसेनेची धावपळ

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यात विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून जोरदार हालचाली सुरू असताना ठाणे विधानपरिषद मतदारसंघात वेगळंच राजकारण रंगताना दिसत आहे. ठाण्याची जागा कोणाच्या वाट्याला जाणार, यावरून भाजप आणि शिंदे गटामध्ये पडद्यामागे मोठी चुरस सुरू असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण राजकीय समीकरणात वसई-विरारमधील बहुजन विकास आघाडी अर्थात बविआच्या 71 मतांना मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळेच आता दोन्ही पक्षांकडून ठाकूर कुटुंबाची मनधरणी सुरू असल्याचं चित्र आहे. ठाणे विधानपरिषद निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांच्या संख्याबळानुसार भाजपची ताकद अधिक असल्याचं मानलं जात आहे. भाजपकडे सध्या 444 नगरसेवकांचं संख्याबळ असल्याची माहिती आहे. तर शिवसेनेकडे 346 मतं आहेत. या पार्श्वभूमीवर संख्याबळाच्या जोरावर भाजप सहज विजय मिळवू शकतो, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. मात्र ठाणे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जात असल्याने ही जागा पुन्हा शिवसेनेकडेच राहावी, असा आग्रह शिंदे गटाकडून धरण्यात आला आहे. त्यामुळे महायुतीत अंतर्गत तणाव वाढल्याची चर्चा रंगली आहे. शिंदे गटाकडून विधान परिषदेसाठी रवींद्र फाटक यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. रवींद्र फाटक हे यापूर्वी विधान परिषदेचे आमदार राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी रवींद्र फाटक यांनी भाई ठाकूर आणि क्षितीज ठाकूर यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली. या भेटीत बविआचा पाठिंबा मिळवण्याबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून बविआच्या मतांसाठी सक्रिय हालचाली सुरू असल्याचं स्पष्ट झालं. मात्र दुसरीकडे भाजपनेही आता या निवडणुकीत आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसत आहे. स्थानिक भाजप नेत्यांनी ठाणे विधानपरिषदेवर स्वतःचा आमदार निवडून आणण्याचा निर्धार केला असल्याची चर्चा आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर नगरसेवक निवडून आणले, तर आता आमदार कधी निवडून आणायचा? असा सवाल स्थानिक भाजप नेते करत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे भाजपनेही पडद्यामागून बविआशी संपर्क वाढवला आहे. भाजप खासदार हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांनी बविआचे माजी महापौर राजीव पाटील यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत विधान परिषद निवडणुकीसाठी पाठिंबा मागण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. बविआचं राजकीय वजन अचानक वाढलं ठाण्यातील या संपूर्ण राजकीय घडामोडींमुळे बविआचं राजकीय वजन अचानक वाढलं आहे. बविआची 71 मतं कोणाच्या बाजूला जाणार, यावर निवडणुकीचं अंतिम चित्र अवलंबून राहू शकतं. भाजपकडे संख्याबळ जास्त असलं तरी बविआची साथ मिळाल्यास शिंदे गटाचं पारडंही जड होऊ शकतं. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून ठाकूर कुटुंबाशी सातत्याने संपर्क साधला जात असल्याची माहिती आहे. आगामी काही दिवसांत या जागेवर अंतिम उमेदवार कोण असणार आणि बविआ नेमकी कोणाला साथ देणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर