ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

पालघर हादरले!:दोन सख्ख्या बहिणींना जाळ्यात ओढून अत्याचार; आक्षेपार्ह व्हिडिओच्या बळावर ब्लॅकमेलिंग, आरोपी फरार

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पालघर जिल्ह्यातील डहाणू परिसरातून नात्याला आणि माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन सख्ख्या बहिणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून त्यांच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणींच्या तक्रारीनंतर डहाणू पोलिसांनी नराधम आरोपीविरुद्ध 1 जून रोजी डहाणू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्याचा शोध सुरू केला आहे. आधी जवळीक, मग ब्लॅकमेलिंगचा घाणेरडा खेळ छळाला कंटाळून अखेर पोलिसांत धाव आरोपीचा जाच आणि मानसिक छळ असह्य झाल्यामुळे अखेर पीडित बहिणींनी या नराधमाच्या तावडीतून सुटण्यासाठी धाडस दाखवले. त्यांनी थेट डहाणू पोलीस ठाणे गाठून घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. पीडितांच्या जबाबानंतर पोलिसांनी त्वरित गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार, पोलिसांकडून शोध सुरू गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच नराधम आरोपी परिसरातून फरार झाला आहे. पोलीस त्याची माहिती गोळा करत असून त्याच्या संभाव्य ठिकाणांवर छापे मारले जात आहेत. महिलांवरील या गंभीर अत्याचारामुळे डहाणू परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर