ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

परिवहन मंत्र्यांकडून बसस्थानकाची आकस्मिक पाहणी:अस्वच्छतेसह चालक-वाहक विश्रांतीगृहातील गैरसोयीवरून संतप्त,‎ अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक रविवारी ७ जूनला पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त शहरात आले होते. रात्री साडेनऊ ते दहा वाजताच्या सुमारास कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी अचानक शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाला भेट देत पाहणी केली. या वेळी त्यांनी बस स्थानकातील स्वच्छता व्यवस्था, चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहाची स्थिती जाणून घेतली. बसस्थानकातील अस्वच्छता, चालक-वाहकांची गैरसोय या समस्यांवरून मंत्री सरनाईक संतप्त झाले. त्यांनी विभागीय वाहतूक नियंत्रक आणि बस स्थानक व्यवस्थापक यांच्या निलंबनाच्या सूचना एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. या‎ कारवाईमुळे परिवहन विभागात मोठी‎खळबळ उडाली आहे. परिवहन मंत्री‎प्रताप सरनाईक यांचा ताफा रात्री‎साडेनऊ ते पावणेदहाच्या दरम्यान ‎मध्यवर्ती बस स्थानकात दाखल‎ झाला. सुरुवातीला त्यांनी सार्वजनिक ‎स्वच्छतागृहाची पाहणी केली. तेथील‎ अस्वच्छता पाहून त्यांनी तीव्र नाराजी‎व्यक्त करत उपस्थित अधिकाऱ्यांना‎जाब विचारला. ‘स्वच्छतेसाठी‎कंत्राटदारांवर मोठा खर्च केला जातो,‎मग प्रत्यक्षात स्वच्छता का दिसत‎नाही?’ असा सवाल त्यांनी केला.‎ यानंतर मंत्री सरनाईक‎बसस्थानकाच्या पहिल्या‎मजल्यावरील चालक-वाहकांच्या‎ विश्रांतीगृहात गेले. तेथे उपस्थित‎ चालक-वाहकांशी चर्चा करताना‎ अनेक समस्या त्यांच्या निदर्शनास‎ आल्या. नव्या गाद्या त्यांच्या भेटीच्या‎ काही तासांपूर्वीच उपलब्ध करून‎ देण्यात आल्याचे चालक-वाहकांनी‎ सांगितले. याशिवाय विश्रांतीगृहातील ‎स्वच्छतागृहांचा वापर बाहेरील ‎व्यक्तींकडून होत असल्याने तेथील‎ परिस्थितीही अत्यंत वाईट असल्याचे ‎समोर आले. या प्रकारामुळे मंत्री ‎सरनाईक यांनी विभागीय वाहतूक‎नियंत्रक सचिन डफळे यांना धारेवर‎धरत तत्काळ स्पष्टीकरण मागितले.‎ त्यानंतर त्यांनी मुंबई स्थित एसटी‎महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना‎दूरध्वनीवरून संपर्क साधून विभागीय‎ वाहतूक नियंत्रक आणि अमरावती ‎मध्यवर्ती बसस्थानक, व्यवस्थापक ‎यांना तत्काळ प्रभावाने निलंबित‎ करण्याच्या सूचना दिल्या.‎चालक-वाहक तसेच प्रवाशांच्या‎सुविधांबाबत कोणतीही हयगय सहन‎केली जाणार नाही, असा इशाराही‎ त्यांनी या वेळी दिला.‎ दर चार तासांनी बसस्थानकाची स्वच्छता व्हायलाच पाहिजे‎ ^प्रवाशांना आवश्यक सुविधा देणे ही महामंडळाची जबाबदारी आहे. बसस्थानक परिसराची दर चार तासांनी स्वच्छता झालीच पाहिजे. चालक-वाहकांसाठी विश्रांतीगृहात योग्य व्यवस्था, प्रवाशांसाठी थंड पिण्याचे पाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. कंत्राटदारांकडून कामाची काटेकोर अंमलबजावणी करून घेतली पाहिजे. मात्र येथे या सर्व बाबींचा अभाव आढळून आला. त्यामुळे दोन अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. – प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर