ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

दादरमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात:चालकाचे नियंत्रण सुटल्याने अनेक वाहनांना उडवले, एकाचा मृत्यू तर अनेक जखमी

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


दादर येथील प्लाझा टॉकीज आणि कोतवाल उद्यान परिसरात आज सकाळी बेस्टच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने बसने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात एकाचा मृत्यू असून अनेक जण जखमी झाले आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस धारावीहून दादरच्या दिशेने येत होती. सकाळी सुमारे ९.१५ ते ९.४५ वाजण्याच्या दरम्यान कोतवाल गार्डन चौकाजवळ चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बसने प्रथम एका ट्रेलरला धडक दिली आणि पुढे कार, दुचाकी तसेच अन्य वाहनांना धडक देत पुढे गेली. या अपघातात एका दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून इतर काही वाहनांचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर मोठी वाहतूक कोंडी घटनेची माहिती मिळताच पोलिस, वाहतूक विभाग आणि बेस्ट प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर दादर टीटी, प्लाझा टॉकीज आणि कोतवाल गार्डन परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. त्यामुळे काही काळ वाहनांची वाहतूक संथ गतीने सुरू होती. दरम्यान, अपघातग्रस्त बस ही इलेक्ट्रिक बेस्ट बस असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांत अशा बसांच्या अपघातांच्या घटना समोर आल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर