ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

हाऊस लिस्टिंग ब्लॉक पूर्ण करणारे खामगाव राज्यात प्रथम:जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जनगणनेमध्ये तालुका प्रशासनाचे नियोजनबद्ध कामकाज‎

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यात १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत घरगणना व घरयादीचे कामकाज यशस्वीरित्या राबवण्यात येत आहे. या कालावधीत ४ जूनला खामगावपर्यंत तालुक्यातील १४९ गावात एकूण ३७८ हाऊस लिस्टिंग ब्लॉक (HLB) मधील कामकाज १०० टक्के पूर्ण करण्यात आले असून ३७८ एचएलबीचे काम शंभर टक्के पूर्ण करत खामगाव तालुका हा राज्यातील पहिला ठरला आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तालुक्यातील महसूल प्रशासनाचे कौतुक करण्यात येत आहे. भारत सरकारच्या जनगणना २०२७ कार्यक्रमांतर्गत घरगणना व घरयादी (House Listing Housing Census) हा अत्यंत महत्त्वाचा आणि मूलभूत टप्पा असून या टप्प्यामध्ये देशातील प्रत्येक घर, कुटुंब व निवासस्थानांची अद्ययावत माहिती संकलित केली जाते. या माहितीच्या आधारे शासनाच्या विविध विकास योजनांचे नियोजन, निधी वाटप तसेच सामाजिक व आर्थिक धोरणांची आखणी केली जाते. जनगणना २०२७ अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या विशेष मोबाइल ॲपच्या माध्यमातून नियुक्त प्रगणकांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक घराला प्रत्यक्ष भेट देऊन सर्वेक्षण केले. घरगणना प्रक्रियेदरम्यान नागरिकांना घर, कुटुंब, सामाजिक, आर्थिक व इतर बाबींशी संबंधित एकूण ३३ प्रश्न विचारण्यात आले. प्राप्त माहिती अचूकपणे मोबाईल ॲपमध्ये नोंदवून डिजिटल पद्धतीने सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले. सदर कामकाज प्रभावीपणे पार पाडण्यासाठी तालुक्यातील सर्व प्रगणकांना पूर्वप्रशिक्षण देण्यात आले होते. प्रशिक्षणामध्ये मोबाईल ॲपचा वापर, माहिती संकलन पद्धती, माहितीची अचूकता आणि जनगणनेचे महत्त्व याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले होते. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून सर्व प्रगणकांनी अत्यंत नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि काटेकोरपणे काम करून घरगणना यशस्वीरित्या पूर्ण केली. ही उल्लेखनीय कामगिरी जिल्हाधिकारी प्रवीणकुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार तथा चार्ज अधिकारी सुनील पाटील आणि निवासी नायब तहसीलदार तथा अतिरिक्त चार्ज अधिकारी सोनाली भाजीभाकरे यांनी सातत्याने आढावा घेऊन आवश्यक मार्गदर्शन व समन्वय साधत परिश्रम घेतले. तालुक्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नामुळे कामगिरी ^जनगणना (Census) म्हणजे देशातील किंवा प्रदेशातील लोकांची पद्धतशीरपणे केलेली शिरगणती. खामगाव तालुक्यातील सर्व पर्यवेक्षक, प्रगणक, महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे ही यशस्वी कामगिरी शक्य झाली आहे. जनगणनेच्या पुढील टप्प्यांमध्येही नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून अचूक माहिती उपलब्ध करून द्यावी – सुनील पाटील , तहसीलदार खामगाव

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर