ब्रेकिंग न्यूज
⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू ✦ ⚡ Woman Farmer: कारभारणीचा ‘महिला शेतकरी’ म्हणून भरा अर्ज, सरकारी योजनांचा मिळेल लाभ, कोणती लागेल कागदपत्रं? ✦ ⚡ विदर्भाच्या ‘समृद्धी’चा मार्ग मोकळा! 42 हजार कोटींचा प्लॅन, 3 नवे महामार्ग होणार, कुठून कुठं जाणार? ✦ ⚡ Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे ✦ ⚡ एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! ✦ ⚡ गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… ✦ ⚡ Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis
SP News Maregaon

नोकरभरती परीक्षांबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय:एकाच कॅडरसाठी एकच परीक्षा; प्रक्रियेत बदलाचा विद्यार्थ्यांना फायदा

4 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


राज्यातील शासकीय नोकरभरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुसूत्र करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. सध्या राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील अनेक भरती परीक्षा खासगी संस्थांकडून घेतल्या जातात. प्रामुख्याने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस) या संस्थांकडून ही प्रक्रिया पार पडते. मात्र परीक्षार्थींवर पडणारा आर्थिक भार लक्षात घेता भविष्यात या सर्व भरती परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या वतीने घेण्याचा विचार असल्याची माहिती मंत्री अशिष शेलार यांनी विधानसभेत दिली. या बदलामुळे परीक्षार्थींना आर्थिक दिलासा मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या खासगी संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या भरती परीक्षांसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकडून साधारणपणे एक हजार रुपये परीक्षा शुल्क आकारले जाते. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना या शुल्कात सुमारे दहा टक्के सवलत दिली जाते. मात्र ही सवलत अपुरी असल्याची भूमिका मांडत भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. त्यांनी राखीव प्रवर्गातील उमेदवारांना मिळणारी सवलत दहा टक्क्यांवरून पन्नास टक्के करण्याची मागणी केली. या चर्चेदरम्यान सुधीर मुनगंटीवार, नितीन राऊत, राजेश पवार, राजकुमार बडोले आणि प्रताप अडसड यांनीही उपप्रश्न उपस्थित करत भरती प्रक्रियेबाबत विविध मुद्दे मांडले. राज्यातील परीक्षार्थींना एकाच पदासाठी वेगवेगळ्या विभागांच्या स्वतंत्र परीक्षा द्याव्या लागू नयेत, यासाठी भरती परीक्षांचे सुसूत्रीकरण करण्यात येत असल्याची माहिती अशिष शेलार यांनी दिली. या प्रक्रियेत कॅडर बकेटिंग, ही संकल्पना लागू केली जाणार आहे. यानुसार एका कॅडरमधील अनेक पदांना एकाच गटात समाविष्ट केले जाईल. त्यामुळे त्या कॅडरमधील सर्व पदांसाठी उमेदवारांना एकाच परीक्षेद्वारे संधी मिळेल. परिणामी उमेदवारांना वारंवार परीक्षा देण्याची किंवा वेगवेगळे परीक्षा शुल्क भरण्याची गरज राहणार नाही. तसेच समान पात्रता असलेल्या पदांच्या सेवा प्रवेश नियमांमध्येही आवश्यक ते बदल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. परीक्षार्थींवरील आर्थिक ताण कमी होईल खासगी संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या भरती परीक्षांवरही राज्य सरकार लक्ष ठेवणार असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. काही ठिकाणी उमेदवारांकडून जास्त शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी येत असल्याने अशा शुल्कावर मर्यादा घालण्यासाठी कॅपिंग, करण्याचाही विचार सुरू आहे. केंद्र सरकार आणि इतर राज्यांमध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांकडून आकारल्या जाणाऱ्या परीक्षा शुल्काचा अभ्यास करून त्यानुसार योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. या बदलांमुळे भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक होण्यासोबतच परीक्षार्थींवरील आर्थिक ताण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर