ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

अमरावती विभागाला सर्वाधिक 8, तर संभाजीनगरला 5.92 कोटींचा निधी:आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनाराज्य सरकारकडून 25 कोटींची मदत

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परतफेडीचा सततचा तगादा या दुष्टचक्रामुळे मृत्यूला कवटाळणाऱ्या राज्यातील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतील शेतकरी कुटुंबांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. शेतकरी आत्महत्याप्रकरणी त्यांच्या वारसांना तातडीने आर्थिक मदत देण्यासाठी महसूल व वन विभागाने २५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय मंगळवार, ९ जून २०२६ रोजी जारी केला आहे. या निधी वाटपात शेतकरी आत्महत्येचे सर्वाधिक चटके सहन करणाऱ्या अमरावती विभागाला सर्वाधिक ८ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. विभागीय आयुक्तांनी आपापल्या अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांच्या मागणीनुसार हा निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा. देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात देशातील शेतकरी आत्महत्येपैकी ४० टक्के शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. राज्यात दररोज सरासरी १७ आत्महत्या हेात आहेत. गेल्या सात दिवसांत ११ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तर पाच महिन्यांत ३१२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यामागे शेतीतील वाढता खर्च, पिकाचा अनिश्चित व कमी भाव, कर्ज व लहरी हवामान ही कारणे आहेत. कोणाला किती निधी? अमरावती ८.७६ कोटी
संभाजीनगर५.९२ कोटी
नागपूर५. ७५ कोटी
नाशिक३.३९ कोटी
पुणे१.०६ कोटी
कोकण१२.०० लाख

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर