ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

निसर्गप्रेमींचा नाशिक महापालिकेवर मोर्चा:जोरदार घोषणाबाजी करत वृक्षतोडीच्या निर्णयाचा केला विरोध; सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी झाडांची कत्तल!

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. या वृक्षतोडीला नाशिक महापालिकेने परवानगी दिली होती. निसर्गाची हानी झाल्याने निसर्गप्रेमी रस्त्यावर उतरले असून आज त्यांनी महापालिकेवर जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढला होता. सिंहस्थ कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सुरू असलेल्या विकासकामांमध्ये वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. तपोवनातील वृक्षतोडीचे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट असतानाच, नाशिक महानगरपालिकेने रस्ते रुंदीकरणात अडथळा ठरत असल्याचा दावा करत पंचवटीतील नांदूर गाव ते जत्रा चौक (197 वृक्ष) आणि पेठ रोड ते नीलगिरीबाग (387 वृक्ष) अशा एकूण 584 वृक्षांच्या कत्तलीचा नवा प्रस्ताव जाहीर केला आहे. या प्रस्तावित वृक्षतोडीसाठी प्रशासनाकडून संबंधित झाडांवर लाल खुणा करण्यात आल्या असून काही ठिकाणी प्राथमिक खोदकामासही सुरुवात झाली आहे. दरम्यान, या निर्णयावर आपल्या हरकती आणि आक्षेप नोंदवण्यासाठी नागरिकांना सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. यावेळी अनेक निसर्गप्रेमी संघटनांनी हरकती नोंदवल्या होत्या. त्यांनंतर आज महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. ‘नाशिक इज गेटिंग हॉटर दॅन माय एक्स’ असे लिहिलेले एक बॅनर देखील या मोर्चाच्या वेळी एका निसर्गप्रेमी तरुणाने दाखवले. तसेच अनेकांनी जोरदार घोषणाबाजी करत महापालिकेच्या निर्णयाचा तीव्र निषेध नोंदवला. वृक्षतोडीमुळे नाशिकच्या पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याची भावना अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या वृक्षतोडीला अनेक कलाकारांनी देखील विरोध दर्शवला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर