ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नयेत म्हणून कुठेतरी कट शिजला:उपमुख्यमंत्रिपद संवैधानिक नाही, तरी घाई का?- विजय वडेट्टीवार

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र करण्यासंदर्भात अजित पवार यांनी का कल्पना दिली नाही हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. भाजपचा निर्णय त्यांच्या पक्षाचे नेते घेतील तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल त्यांच्या पक्षाचे नेते निर्णय घेतील. भाजपला सांगितले का नाही? त्यांना सांगितल्याशिवाय पुढचा काही कार्यक्रमच ठरत नाही का? मग हा पक्ष भाजप म्हणेल त्या पद्धतीने चालतो का? असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतात. पण एक खरे की दोन पक्ष एकत्र येऊ नये म्हणून हा कट कुठे तरी शिजला आणि त्यातून ही ठिणगी पडली असे मला वाटते असे मला वाटते, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, उपमुख्यमंत्रिपद हे संवैधानिक पद नाही त्यामुळे हे सर्व काही तेराव्यानंतर सुद्धा होऊ शकले असते. पण यामध्ये खूप काही शिजत आहे. अजित पवार यांची दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र याव्यात अशी इच्छा होती असे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले, त्यांनी अजित पवार यांची शपथ सुद्धा घेतली. पण आता राजकारण फार सडके झालेले आहे. मला वाटते की राष्ट्रवादीचे पुढे काय होईल यावर आपण चर्चा न करता ते विधात्यावर सोडून द्यावे. गोयल यांनी अंदाज घेतला विजय वडेट्टीवार म्हणाले की, शरद पवार यांच्या जवळचे लोकं विलीनीकरणाबद्दल ठासून सांगत आहेत. त्यावरुन आता यावर आम्ही बोलण्यापेक्षा दोन्ही पक्षातील लोकांना काय ते ठाऊक आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येऊ नये हा कट कुठेतरी शिजला आणि त्यातून ही ठिंणगी पडली असे मला वाटते. पियुष गोयल यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचे वक्तव्य केले आणि अंदाज घेऊन पाहिला. निगेटिव्ह कमेंट आल्याने तो प्रस्ताव थांबवला. नाहीतर काय पटेल होऊन जातील असे सर्व नियोजन होते. विमान अपघाताबद्दल लोकांना संशय विजय वडेट्टीवार म्हणाले की, अजित पवार यांच्या विमानाचा अपघाताबद्दल राज्यातील 80 टक्के लोक संशय व्यक्त करत आहेत. सोशल मिडीयावर आपण सर्व जण पाहतोय की लोकं बोलताय हा अपघात नाही तर घातपात आहे. सहावी बॉडी कुठे गेली? वेळेवर पायलट का बदलला गेला हा सुद्धा प्रश्न आहे. ज्या पायलटचे नाव पुढे आला होता तो जिवंत आहे. कारण तो वेळेवर पोहचू शकला नाही किंवा त्यांच्या ऐवजी कपूर नावाच्या दुसऱ्या पायलेटला तिथे पाठवले. पण एक नक्की की दाल मे कुछ काला लगता है. याची चौकशी होणं गरजेचे आहे. मंत्री स्वत:ला राजे समजताय विजय वडेट्टीवार म्हणाले की, नाही आता नवीन राजे गेलेत आणि हे राजे आलेत स्वत:ला राजे म्हणून घेणाऱ्या लोकांना सरकारचा पैसा आणि मिळकत त्यांची वाटते. खुर्ची आणि सत्ता राजेशाहीप्रमाणे राबवण्याची पद्धत आता वाढीस लागली आहे त्यातूनच असे मंत्री काही वक्तव्य करत करत आहे. ते सेवक आहेत मालक नाहीत. त्यांच्या डोक्यात सत्तेची मस्ती गेलेली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य केले जातात.नीतेश राणे यांनी काल एक वक्तव्य केले की मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत. मी जे सांगेल तेच होईल असे वक्तव्य केले होते यावर बोलताना वडेट्टीवार यांनी टोला लगावला आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर