ब्रेकिंग न्यूज
Vasai-Virar Mahapalika मध्ये कर्मचारी भरतीवरून राडा, भाजप आणि बविआ आमने-सामनेे एक शेळीपासून सुरू केलेला व्यवसाय, आता 40 शेळ्यांचा मालक, सिद्धेश्वर यांचा वर्षाचा कमाईचा आकडा पाहाच! गौरीपूजनाला गावी गेले, छ. संभाजीनगरात 4 घरं फोडली; लाखोंची लूट, पण 4 तोळ्यांचा हार तिथंच फेकला, शॉकिंग कारण… Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian …
SP News Maregaon

अहिल्यानगरात शिंदे गटाला जोरदार झटका:5 उमेदवारांचे अर्ज बाद; एबी फॉर्मवरील खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, झेरॉक्स प्रत जोडणे भोवले

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत सर्वाधिक 54 जागा लढवणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेला जबर झटका बसला आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी उमेदवार अर्जाच्या छाननीत 5 उमेदवारांचे अर्ज बाद ठरवलेत. या उमेदवारांना अनुमोदकाची चुकीची स्वाक्षरी, एबी फॉर्मवरील खाडाखोड, अर्जासोबत झेरॉक्स प्रत जोडणे आदी चुका भोवल्या आहेत. अहिल्यानगर महापालिकेसाठी येत्या 15 जानेवारीला निवडणूक होणार आहे. त्यासाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. बुधवारी झालेल्या अर्जांच्या छाननीत सत्ताधारी शिंदे गटाच्या 5 उमेदवारांचे अर्ज बाद ठरले. यापैकी एक अर्ज अनुमोदकाची चुकीची स्वाक्षरी असल्याने बाद झाला. तर इतर 4 अर्ज एबी फॉर्म न जोडणे, एबी फॉर्मची झेरॉक्स प्रत जोडणे व जोडलेल्या एबी फॉर्मवर खाडाखोड करणे आदी कारणांमुळे बाद ठरवण्यात आले. यामुळे महापालिकेच्या 54 जागा लढवणाऱ्या शिंदे गटाचा आकडा 49 वर घसरला आहे. अर्जावर कोणते घेण्यात आले आक्षेप? विशेष म्हणजे बहुतांश प्रभागांतील उमेदवारांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अर्जांवर विविध आक्षेप नोंदवले. यात महापालिकेचा कर थकवणे, रस्त्यांवर अतिक्रमण करणे, अवैध बांधकाम करणे, अनुमोदकाची चुकीची स्वाक्षरी, अर्जाच्या प्रस्तावकाची खोटी स्वाक्षरी आदी तक्रारींचा समावेश होता. या तक्रारींवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तत्काळ सुनावणी घेत या तक्रारींची पडताळणी केली. त्यात ज्या तक्रारींमध्ये तथ्य आढळले ते अर्ज अवैध ठरवण्यात आले. पडताळणीअंती 788 पैकी 17 अर्ज अवैध ठरले. तर 771 अर्ज वैध ठरले. शिंदे गटातील कुणाचे अर्ज ठरले बाद? यासंबंधीच्या माहितीनुसार, प्रभाग क्रमांक 8 मधील शिंदे गटाचे उमेदवार राहुल कातोरे यांच्या उमेदवारी अर्जावरील अनुमोदकाच्या स्वाक्षरीवर आक्षेप घेण्यात आला. या स्वाक्षरीची प्रत्यक्ष पडताळणी केल्यानंतर ती चुकीची असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात आला. त्यांनी अपक्ष अर्ज भरलेला नव्हता. प्रभाग क्रमांक 6 मध्ये विशाल शितोळे यांनी एबी फॉर्म जोडलेला नसल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरवला. पण त्यांनी दाखल केलेला अपक्ष अर्ज वैध ठरला. प्रभाग क्रमांक 6 मधील उमेदवार अमित खामकर यांनी एबी फॉर्मची झेरॉक्स प्रत जोडल्याने त्यांचाही अर्ज बाद ठरला. त्यांचा अपक्ष अर्ज वैध ठरला. प्रभाग क्रमांक 16 मध्ये हर्षवर्धन कोतकर यांच्या एबी फॉर्ममध्ये खाडाखोड असल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. इथे त्यांचाही अपक्ष अर्ज वैध ठरला. प्रभाग क्रमांक 17 मध्ये गौरी नन्नावरे यांच्या एबी फॉर्ममध्ये खाडाखोड असल्यमुळे त्यांचाही अर्ज अवैध ठरला. पण अपक्ष अर्ज वैध ठरला. घाईच ठरली घातक शिंदेसेनेचे पाच अर्ज अवैध ठरविण्यात आले. अन्य पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदेसेनेकडे उमेदवारीसाठी काही जणांनी संपर्क केला. त्यामुळे उपलब्ध असलेल्या एबी फॉर्मवर खाडाखोड करून व्हाईटनर लावून उमेदवारांची नावे टाकण्यात आले, तर काहींना एबी फॉर्मची झेरॉक्स देण्यात आली. त्यामुळे छाननीत हे अर्ज अवैध ठरले. शिंदे गटावर अपक्षांना पाठिंबा देण्याची वेळ आपल्या 5 उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद ठरल्यामुळे शिंदे गटावर अपक्ष उमेदवारांना पाठिंबा देण्याची वेळ आली आहे. शिंदे गटाचे शहरप्रमुख सचिन जाधव यांनी याविषयी सांगितले की, छाननीमध्ये आमचे जे उमेदवार बाद ठरले आहेत व ज्यांचे अपक्ष उमेदवार अर्ज वैध आहेत त्यांना, तसेच ज्यांनी आमच्याकडे उमेदवारीची मागणी केली होती, पण काही कारणांमुळे त्यांना उमेदवारी मिळाली नाही अशा उमेदवारांना आता पक्षाच्यावतीने पुरस्कृत केले जाईल. एका उमेदवाराचा ठाकरे व शिंदे गटाकडून अर्ज प्रभाग क्रमांक 16 मधील सुनीता कोतकर यांनी शिवसेनेच्या ठाकरे व शिंदे अशा दोन्ही गटांकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीत त्यांनी शिंदे गटाचा अर्ज कायम ठेवला. त्यामुळे ठाकरे गटाच्या यादीतील 1 उमेदवार कमी झाला आहे. आता महापालिका निवडणुकीच्या मैदानात ठाकरे गटाचे केवळ 23 उमेदवार मैदानात आहेत.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर