ब्रेकिंग न्यूज
Maratha OBC Reservation: मराठा आरक्षणाचा वाद पुन्हा पेटणार? जरांगेंच्या आक्रमकतेला उत्तर देण्यासाठी OBC सम… India Vs Sri Lanka : ‘सरफराज खानला क्लियारिटी द्या…’, गंभीरला झापलं! मुंबईकर खेळाडूसाठी मैदानात उतरला 765… Chandrapur : खेळता खेळता बाळाने ट्यूबचं टोपण गिळलं,कुटुंबियांच्या काळजाचा ठोका चुकला, पुढे काय घडलं? उभ्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक; तरुण गंभीर जखमी मारेगावच्या वारंवार वीजखंडितीविरोधात नागरिक आक्रमक; सात दिवसांचा अल्टिमेटम Kolhapur: चारित्र्याचा संशय, गाडीवरून जातानाच बिनसलं, पतीनं…, भरदिवसा कोल्हापूरच्या रस्त्यावर थरार Konkan Railway: कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी गुड न्यूज, विशेष रेल्वेला अतिरिक्त थांबे, पण कुठे? पतीच्या व्हॉट्सॲपवरून नंबर घेतला, त्याला अडचण सांगितली, 26 वर्षांच्या विवाहितेला ‘ती’ चूक भोवली, छ. संभाजी… FDA News | अन्नाच्या नावाखाली काळा धंदा! FDA कडून पर्दाफाश | Tukaram Mundhe News | Special Report Satish Maratha Murder : ‘प्रत्येक चौकात मीच टिकणार…’, सतीश मराठावर 39 सपासप वार करण्याआधी राहुलचा शेवटचा …
SP News Maregaon

बैल विकले, मग दोन मुलांनीच ओढला नांगर!:जळगावातील शेतकरी कुटुंबाची हृदयद्रावक कहाणी, पाचोरा तालुक्यातील घटना

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


महाराष्ट्रात एकीकडे आधुनिक शेती, ड्रोन, स्मार्ट अॅग्रीकल्चर आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे ग्रामीण भागातील वास्तव मात्र अंगावर काटा आणणारं आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. बैलजोडीचा खर्च परवडत नसल्याने एका शेतकऱ्याने आपल्या दोन पोटच्या मुलांनाच नांगराला जुंपून चार एकर शेतात कपाशीसाठी सऱ्या पाडल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बिकट परिस्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आर्थिक संकटामुळे उरला नाही पर्याय पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द गावातील अल्पभूधारक शेतकरी ज्ञानेश्वर रतन शहाणे हे आर्थिक संकटाशी झुंज देत आहेत. त्यांनी उमरदे शिवारातील शेती कसण्यासाठी घेतली आहे. खरीप हंगामासाठी कपाशीची पेरणी करण्याची वेळ आली होती. मात्र बैलजोडी भाड्याने आणण्यासाठी किंवा ट्रॅक्टर घेण्यासाठी आवश्यक पैसे त्यांच्याकडे नव्हते. अखेर दुसरा कोणताही पर्याय उरला नसल्याने त्यांचे दोन मुलगे गणेश आणि विनेश यांनीच वडिलांना मदत करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही मुलांनी औताला स्वतःला जुंपून घेतले आणि दिवसभर चार एकर शेतात कपाशीसाठी सऱ्या पाडल्या. या प्रसंगाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले. मुलांच्या खांद्यावर औताचा भार आणि मागून वडील नांगर चालवत असल्याचे दृश्य पाहून शेतकऱ्यांच्या वेदना किती खोल आहेत, याची कल्पना येते. पाचोऱ्यातील हा व्हिडिओ केवळ एका कुटुंबाची कथा नाही. तो ग्रामीण भागातील आर्थिक असमानता आणि शेतीतील वाढत्या संकटांचे प्रतीक ठरत आहे. खरीप हंगाम सुरू होत असताना अनेक भागांत खतटंचाई, वाढते उत्पादन खर्च आणि पावसाची अनिश्चितता यामुळे शेतकरी आधीच चिंतेत आहेत. अशा परिस्थितीत मशागतीसाठी आवश्यक साधनसामग्रीही परवडत नसल्याचे चित्र अनेक गावांत दिसून येत आहे. लातूरमध्ये पत्नीने घेतलं बैलाचं स्थान; मदतीसाठी धावले मुख्यमंत्री जळगावातील ही घटना चर्चेत असतानाच काही दिवसांपूर्वी लातूर जिल्ह्यातील एक हृदयद्रावक प्रसंग राज्याने पाहिला होता. देवणी तालुक्यातील बोंबळी गावातील शेतमजूर काशिनाथ गायकवाड यांचा बैल वादळी पावसात वीज पडून मृत्युमुखी पडला. गायकवाड हे भूमिहीन शेतमजूर असून दुसऱ्यांची शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कुटुंबात दोन मुलगे आणि चार मुली आहेत. ऐन पेरणीच्या हंगामात एकमेव बैल गमावल्याने त्यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले. आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने नवीन बैल खरेदी करणे शक्य नव्हते. अशा वेळी त्यांच्या पत्नीने पुढाकार घेत स्वतःच खांद्यावर जू घेतले आणि बैलाच्या जागी नांगर ओढत शेतीची कामे सुरू ठेवली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संताप आणि हळहळ व्यक्त करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल लातूरमधील हा व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तातडीने प्रशासनाला मदतीच्या सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेत स्थानिक गोशाळेच्या माध्यमातून गायकवाड कुटुंबाला बैल उपलब्ध करून दिला. त्यामुळे पेरणीच्या कामाला वेग आला आणि कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. सविस्तर बातमी वाचा शेतीतील वाढता खर्च आणि घटते उत्पन्न गेल्या काही वर्षांत खत, बियाणे, कीटकनाशके, इंधन आणि मजुरी यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र त्याच वेळी शेतीमालाला हमीभाव किंवा बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याची तक्रार शेतकरी सातत्याने करत आहेत. यामुळे अनेक कुटुंबांची आर्थिक घडी विस्कटली असून, काही ठिकाणी बैल विकणे, जनावरे कमी करणे किंवा शेतीसाठी आवश्यक गुंतवणूक टाळणे अशा परिस्थिती निर्माण होत आहेत. जळगावातील दोन मुलांनी नांगर ओढल्याची घटना ही केवळ एका कुटुंबाची कथा नाही. ती ग्रामीण महाराष्ट्रातील हजारो लहान शेतकरी कुटुंबांच्या संघर्षाचे प्रतीक आहे. शेती टिकवण्यासाठी आणि पेरणी वेळेत पूर्ण करण्यासाठी कुटुंबातील लहान मुलांनाही शेतात उतरावे लागत असल्याचे हे चित्र अस्वस्थ करणारे आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर