ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

​बाळ विक्री प्रकरणाला थरारक वळण:मुख्य सूत्रधार डॉक्टर नीतेश बाजपेयीचा आत्महत्येचा प्रयत्न; अटकेच्या भीतीने स्वतःवर केले वार

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या 10 दिवसांच्या बालिकेच्या विक्री प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी डॉक्टर नीतेश बाजपेयी याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांचा ससेमिरा आणि अटकेची भीती यामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर नीतेश बाजपेयी 14 फेब्रुवारी रोजी कटंगी येथून स्वतःच्या वाहनाने भंडाऱ्याच्या दिशेने येत होता. प्रवासादरम्यान त्याने स्वतःजवळ असलेल्या ब्लेडने शरीरावर आणि पोटावर गंभीर वार करून घेतले. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या डॉक्टराला तातडीने तुमसर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी भंडाऱ्यातील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. प्रकरणाची पार्श्वभूमी आणि ‘रुग्णालय कनेक्शन’ एका गरीब दाम्पत्याच्या 10 दिवसांच्या मुलीला ‘नागपूरला मोफत उपचार करून देतो’ असे खोटे आमिष दाखवून, 3 फेब्रुवारी रोजी तिचा अडीच ते तीन लाख रुपयांत सौदा करण्याचा प्रयत्न उघडकीस आला होता. डॉक्टर बाजपेयी हा गोंदियातील ‘न्यू बालाजी हॉस्पिटल’चा संचालक आहे. या संपूर्ण रॅकेटचा तो मुख्य सूत्रधार मानला जातो. या प्रकरणात आतापर्यंत 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी दोघांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. जामिनापूर्वीच उचलले टोकाचे पाऊल डॉक्टर बाजपेयी याच्या अटकपूर्व जामिनावर 17 फेब्रुवारी रोजी न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र, अटकेच्या धास्तीने त्याने सुनावणीच्या 3 दिवस आधीच स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पोलिस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. ​भंडारा पोलिस आता डॉक्टर बाजपेयी याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची वाट पाहत आहेत. तो शुद्धीवर आल्यानंतर त्याची अधिकृत चौकशी करून त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या आत्महत्येच्या प्रयत्नामागे केवळ भीती आहे की आणखी काही गुपिते दडलेली आहेत? याचा तपास आता पोलिस करत आहेत..

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर