ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

माझी कटिबद्धता संविधानाशी, ‘कंडक्ट रुल्स’चा कोणताही भंग केलेला नाही:RSSच्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यावर नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचे उत्तर

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


वरिष्ठ आयपीएस (IPS) अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी नुकताच नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमाला लावलेल्या हजेरीवरून सुरू असलेल्या वादावर मौन सोडले. “माझी कटिबद्धता केवळ भारतीय संविधानाशी असून, त्या कार्यक्रमात मी कोणत्याही ‘कंडक्ट रुल्स’चा (सेवा नियमांचा) भंग केलेला नाही,” असे स्पष्टीकरण नांगरे पाटील यांनी दिले आहे. काँग्रेसने काय आक्षेप घेतले होते? विश्वास नांगरे पाटील यांच्या या स्पष्टीकरणापूर्वी राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने यावर तीव्र आक्षेप नोंदवला होता. काँग्रेस नेत्यांनी ‘ऑल इंडिया सर्व्हिसेस कंडक्ट रुल्स’चा (All India Services Conduct Rules) दाखला देत प्रश्न उपस्थित केला होता की, “संविधानाची शपथ घेणारा आणि सरकारी सेवेत असणारा एक वरिष्ठ पोलीस अधिकारी एखाद्या विशिष्ट विचारधारेच्या मंचावर कसा जाऊ शकतो? यासाठी त्यांनी राज्य सरकारची (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची) पूर्वपरवानगी घेतली होती का?” यावरून काँग्रेसने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. याच सर्व आक्षेपांना विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत सविस्तरपणे उत्तरे दिली. माझी निष्ठा फक्त संविधानाशी आणि बाबासाहेबांच्या मूल्यांशी आपली भूमिका स्पष्ट करताना नांगरे पाटील म्हणाले, “मी एक भारतीय पोलीस सेवेतला अधिकारी आहे. माझी कटिबद्धता केवळ भारतीय संविधानाशी आणि संविधानातल्या मूल्यांशी आहे. नागपूर ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी आहे. त्यांच्या विचारांचे, तत्त्वांचे आणि राज्यघटनेतील मूल्यांचे आम्ही पाईक आहोत आणि राहू. कायद्याचे राज्य अबाधित ठेवणे हे माझे प्राथमिक कर्तव्य आहे.” प्रबोधन आणि जनजागृती हेही पोलिसांचेच काम पोलीस दलाच्या कामाचे स्वरूप समजावून सांगताना ते म्हणाले, “पोलिसिंग हे केवळ ‘रिएक्टिव्ह’ (गुन्हा घडल्यावर कारवाई करणे) नसते, तर ते ‘प्रिव्हेंटिव्ह’ आणि ‘प्रोअॅक्टिव्ह’ही असते. कायद्याची अंमलबजावणी करण्यासोबतच लोकांमध्ये जनजागृती करणे, शिक्षण आणि प्रबोधन करणे हे सुद्धा पोलिसांचे कर्तव्य आहे. त्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक संघटनांच्या विधायक कार्यक्रमांत जाऊन युवक, महिला आणि वृद्धांना मार्गदर्शन करणे हा आमच्या कर्तव्याचाच एक भाग आहे.” ‘त्या’ कार्यक्रमाचे स्वरूप आणि निमंत्रण वादग्रस्त ठरलेल्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगताना त्यांनी माहिती दिली की, “हा कार्यक्रम 19 एप्रिल रोजी ‘सकल हिंदू समाज, सानपाडा’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. ‘वंदे मातरम’ला 150 वर्षे आणि ‘आरएसएस’ला 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा कार्यक्रम होता. प्रतिष्ठित सीए, आर्किटेक्ट आणि डॉक्टर्स मला निमंत्रण द्यायला आले होते. हा कार्यक्रम माझ्या ऑफिसच्या वेळेनंतर, रात्री 8 वाजता होता. या कार्यक्रमात योगा इन्स्टिट्यूटच्या हंसाजी, कस्टम-जीएसटी कमिशनर आणि इस्कॉन व ब्रह्मकुमारीच्या आध्यात्मिक गुरूंचीही भाषणे झाली.” मी सर्वच धर्मांच्या कार्यक्रमांना जातो आपल्या निधर्मी भूमिकेवर भर देताना ते म्हणाले, “मी 30 वर्षे पोलीस सेवेत आहे. रमजान ईद, जैन, बौद्ध आणि ख्रिश्चन धर्मीयांच्या अनेक रचनात्मक कार्यक्रमांना मी नित्याने जात असतो. रमजानच्या कार्यक्रमात मी कुराणातील आयती वाचून दाखवतो, तर या कार्यक्रमात मी उपनिषदांमधील शांती मंत्र आणि ज्ञानेश्वरीतील ‘पसायदान’ यावर सविस्तर बोललो. विश्वबंधुत्वाची आणि प्रेमाची शिकवण देणाऱ्या धर्माबद्दल मी बोललो.” मी केवळ कायद्याच्या चौकटीत बोललो त्या कार्यक्रमातील आपल्या भाषणाचा आशय स्पष्ट करताना नांगरे पाटील यांनी सांगितले की, “मी तिथे व्यसनाधीनता आणि ड्रग्जविरोधात युवकांचे प्रबोधन केले. पोलिसांमधील करिअरच्या संधी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘प्रिव्हेंशन ऑफ करप्शन ॲक्ट’ (भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा) बद्दल माहिती दिली. यातून कोणी काय अर्थ लावला याच्याशी मला देणेघेणे नाही. मी जे काही बोललो ते कायद्याच्या आणि नियमांच्या चौकटीत राहूनच बोललो आहे. यात कोणत्याही ‘कंडक्ट रुल्स’चा भंग झालेला नाही.” काँग्रेसने उपस्थित केलेले सेवा नियमांचे आक्षेप आणि राजकीय टीकेला नागपूरचे नवे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी उत्तर दिले आहे. हा कार्यक्रम केवळ प्रबोधनात्मक होता आणि त्यात उपस्थित राहणे हे आपल्या सामाजिक कर्तव्याचाच भाग असल्याचे सांगत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित बातमी वाचा… खाकी वर्दीतला अधिकारी की संघाचा प्रचारक?:विश्वास नांगरे पाटलांवरून काँग्रेसने गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारले ‘हे’ 6 प्रश्न! नागपूरचे नवनियुक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमात हजेरी लावत संघाचे आणि डॉ. हेडगेवार यांचे गौरवगान केले होते. यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने तीव्र आक्षेप नोंदवला असून, थेट राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. “विश्वास नांगरे पाटील यांनी संविधानापेक्षा संघाला मोठे मानले का? ते संविधानाचे अधिकारी म्हणून बोलत होते की विशिष्ट विचारधारेचे प्रतिनिधी म्हणून?” असा संतप्त सवाल करत काँग्रेसने सरकारला प्रशासकीय आणि कायदेशीर नियमांचा (All India Services Conduct Rules) हवाला देत थेट 6 प्रश्न विचारले आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी ‘वर्दीची शपथ विसरून संघाची स्तुती…’:संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांवर काँग्रेसची टीका नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त (CP) विश्वास नांगरे पाटील हे त्यांच्या एका कार्यक्रमातील उपस्थितीमुळे आणि विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि संस्थापकांची स्तुती केली. यावरून काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत “ते संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरून संघाची चाटुगिरी करत आहेत,” अशी घणाघाती टीका केली आहे. एकीकडे काँग्रेसने नांगरे पाटलांना टार्गेट केले असताना, दुसरीकडे नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र त्यांचे स्वागत करत नागपूरच्या सुधारलेल्या कायदा व सुव्यवस्थेचे कौतुक केले आहे. येथे वाचा सविस्तर बातमी

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर