ब्रेकिंग न्यूज
Superfast 100 News | सुपरफास्ट बातम्या | 23 September | Sunil Shelke News | SIM Cars News | Fadnavis साहेब, कसं जगायचं! पिकांचा उरला फक्त पाला, डोळ्यात पाणी आणणारा शेतकऱ्याचा VIDEO भावी पतीलाच दिसले नको ते फोटो, मुंबईतल्या तरुणीसोबत भयंकर घडलं, 10 हजारांची डिमांड अन् ‘इन्स्टा’वर… अशक्य काहीच नाही! टेनिस कोर्टवरचा ‘गोल्डन बॉय’ झाला CA, पहिल्याच प्रयत्नात कसं मिळवलं यश? Video लेकीला घेऊन आई घरी निघाली, वाटतेच मोपेड घसरली, मागून काळ बनून आला डंपर, क्षणात…, कोल्हापूर हळहळलं बनावट CBI अधिकारी, ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली 100 कोटींचा गंडा, पुण्यातील धक्कादायक घटना… Sonam Maskar : कोरोनात मुंबई सोडून कोल्हापूर गाठलं; प्रॉपर्टी विकून लेकीचं स्वप्न पूर्ण केलं; पोरीनं Asian … Tukaram Mundhe : एफडीएमध्ये आधी काय सुरू होतं? तुकाराम मुंढेंनी मनापासून सगळं सांगितलं; म्हणाले, “माझ्याआधी… मोबाईल बाजूला ठेवायला लावला, कामाच्या ठिकाणी महिलेला मागील खोलीत बोलावले अन्…, छत्रपती संभाजीनगरमधील धक्क… Mumbai Local: गणपती विसर्जनासाठी मध्य रेल्वे सज्ज, मुंबईत 22 विशेष लोकल चालवणार, संपूर्ण वेळापत्रक
SP News Maregaon

गडचिरोलीत आंतरराष्ट्रीय योग दिन:700 हून अधिक पोलिस अधिकारी- जवानांचा सहभाग

3 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


गडचिरोली येथे 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गडचिरोली पोलिस दलातर्फे सामूहिक योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. पोलिस मुख्यालय येथे सकाळी 6 वाजता सुरू झालेल्या या शिबिरात 700 हून अधिक पोलिस अधिकारी व अंमलदारांनी सहभाग घेतला. भारतीय प्राचीन संस्कृती आणि परंपरेत योगाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात शरीर तंदुरुस्त, सशक्त आणि मन प्रफुल्लित ठेवण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. पोलिस अधीक्षक एम. रमेश यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुख्य शिबिरात योगासने केली. मुख्य शिबिरासोबतच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालये, पोलिस उप-मुख्यालय, प्राणहिता, तसेच सर्व पोलिस स्टेशन, उपपोलिस स्टेशन आणि पोलिस मदत केंद्रांवरही एकाच वेळी सामूहिक योग शिबिरे उत्साहात पार पडली. प्राणहिता येथील शिबिरात सीआरपीएफ आणि विशेष अभियान पथकाचे जवळपास 500 जवान उपस्थित होते. याप्रसंगी योग प्रशिक्षक मिलिंद उमरे आणि श्रीमती अंजली कुळमेथे यांनी उपस्थितांना योगाचे विविध प्रकार शिकवले आणि त्याचे महत्त्व पटवून दिले. शरीर व मन सक्षम ठेवण्यासाठी कोणती योगासने करावीत, याचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन त्यांनी केले.

पोलिस अधीक्षक एम. रमेश यांनी सर्वांना आपल्या दैनंदिन जीवनशैलीत व्यायामाला स्थान देऊन रोज किमान 20 मिनिटे योगासाठी वेळ देण्याचे आवाहन केले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी पोलिस मुख्यालयाचे रापोनि अनुजकुमार मडामे, पोलिस कल्याण शाखेचे प्रभारी अधिकारी नरेंद्र पिवाल यांच्यासह सर्व शाखांच्या प्रभारींनी परिश्रम घेतले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर