ब्रेकिंग न्यूज
⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं? ✦ ⚡ Mumbai Local: मुंबईकर गणेश विसर्जनाला बाहेर पडताय? चर्चगेट ते विरार धावणार जादा गाड्या, पण 84 लोकलचा ‘तो’ थ… ✦ ⚡ Crime : बापाला बायकोने जीवे मारलं, पण पोराला भलत्याच गोष्टीच दुःख, सूनबाई क्रिमिनल का बनली? ✦ ⚡ बाऊन्ड्री लाईनवर थरार, दोन बोटांनी घेतली कॅच, अख्खं स्टेडिअम उभं राहून पाहत राहिलं, VIDEO ✦ ⚡ महिला शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन प्रमाणपत्र नोंदणी सुरू
SP News Maregaon

चंद्रग्रहणामुळे घृष्णेश्वर मंदिरात उद्या चार तासांसाठी दर्शन बंद:दुपारी 3 पासून मंदिर बंद, सायंकाळी 7 नंतर दर्शन सुरू

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरातील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर मंगळवारी (३ मार्च) खग्रास चंद्रग्रहणामुळे दर्शनासाठी दुपारी तीनपासून सायंकाळी सातपर्यंत दर्शनासाठी बंद राहील. ग्रहणाच्या कालखंडात मंदिराचे दरवाजे बंद ठेवण्याची परंपरा असल्याने मंदिर प्रशासनाने दर्शनाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. धूलिवंदन, सुट्यांमुळे गर्दीची शक्यता : ३ मार्च रोजी होळी (धूलिवंदन) हा सण असल्याने दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, दुपारी ३:०० ते ७:०० या वेळेत भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश किंवा दर्शन घेता येणार नाही. लांबून येणाऱ्या भाविकांनी आणि पर्यटकांनी या वेळेची विशेष नोंद घेऊन आपले नियोजन करावे, असे आवाहन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कुणाल दांडगे व घृष्णेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे. लेणी, मंदिर बंद असल्याने पर्यटक नाराज योगायोगाने मंगळवारी वेरूळ लेणीचा साप्ताहिक देखभालीचा दिवस असल्याने लेणी पर्यटकांसाठी बंद असते. त्यातच आता दुपारी मंदिरही बंद राहणार असल्याने बाहेरगावांहून येणाऱ्या पर्यटकांना लेणी आणि मंदिर या दोन्ही दर्शनापासून मुकावे लागणार आहे. प्रशासनाने होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. घृष्णेश्वर मंदिरातील दर्शनाचे वेळापत्रक

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर