ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

सुनेत्रांचा ‘दादा’गिरीचा इशारा:राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यात ‘कडक’ शब्दांत सुनावले

2 Views
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर साडेचार महिने जाहीर वक्तव्ये टाळणाऱ्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गुरुवारी कडक पवित्रा घेतला. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या २७ व्या वर्धापन दिन सोहळ्यात राष्ट्रीय अध्यक्षाच्या भूमिकेतून स्वपक्षीय नेत्यांना उद्देशून त्या म्हणाल्या की, पक्षहितासाठी ‘दादां’सारखेच कठोर निर्णय घेण्यास मला अजिबात जड जाणार नाही. अजितदादांनी हयातीत सर्वांचे हट्ट पुरवले, पदं दिली; पण यापुढे पक्षाची बदनामी सहन करणार नाही. भाजप तसेच रोहित पवारांचे नाव घेणे टाळत त्यांनी ‘पक्षात कुणाचाही अनावश्यक हस्तक्षेप सहन करणार नाही’ असाही इशारा दिला. तर १९९९ मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजनांच्या आग्रहामुळे सहा महिने आधीच विधानसभा निवडणूक झाली. म्हणून राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्याची संधी हुकली असा दावा छगन भुजबळ यांनी केला. मेळाव्यात भुजबळ आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंमध्ये जुगलबंदीही झाली. पक्षाची वाटचाल स्पष्ट करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, आगामी महामंडळ नियुक्त्यांमध्ये केवळ ज्येष्ठता न पाहता पात्रता, पक्षनिष्ठा आणि समर्पणालाच संधी दिली जाईल. पक्षविस्तारासाठी बाहेरील नेत्यांना प्रवेश देताना काही तडजोडी कराव्या लागल्या, तरी मूळ निष्ठावंत कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल. सुनेत्रा पवारांचा रोख कुणाकडे आणि का? भाजप : लोकसभा, विधानसभेला तसेच नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार ठरवण्यात भाजपने हस्तक्षेप केला. शरद पवार उमेदवार असतील तर राज्यसभेला महायुतीचा उमेदवार नसेल, असे भाजपने परस्परच जाहीर केले होते. रोहित पवार : रोहित पवार सातत्याने अजित पवार गटाला टार्गेट करत आहेत. अप्रत्यक्षपणे सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय यांच्यावर टीका करत आहेत. बारामती मतदारसंघातही हस्तक्षेप करत आहेत. नरहरी झिरवाळ : अन्न व औषधी प्रशासन मंत्रिपदावर ठसा उमटवता आला नाही. त्यांच्या लाच आणि अश्लील व्हिडिओमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली. पटेल, भुजबळ, तटकरे : तिघेही ज्येष्ठ नेते पक्षावर ताबा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. छगन भुजबळ-तटकरेंनी राज्यसभेवरून जाहीरपणे वादावादी केली. सुनील टिंगरे : विधान परिषद निवडणुकीत सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांनी विक्रम काकडेंची उमेदवारी जाहीर केल्यावर सुनील टिंगरेंनी त्याला आव्हान दिले. दोन वर्षांपू्र्वी पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात टिंगरे यांचे नाव आले होते. भुजबळ कबड्डीपटू, ते घेरून बाद करतात : सुनील तटकरे सुनील तटकरे म्हणाले की, भुजबळ उत्तम कबड्डीपटू आहेत. कबड्डीत समोरच्याला घेरून बाद करण्याची आणि लाइन क्रॉस करण्याची जी रणनीती असते, तीच भुजबळांनी त्यांच्या राजकीय प्रवासात आजवर वापरली आहे. खेळात राजकारण, राजकारणाचा खेळ करू नका : छगन भुजबळ प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या रणनीतीमुळे राज्यसभेची संधी हुकल्याची खंत अप्रत्यक्षपणे व्यक्त करत छगन भुजबळ म्हणाले की, “खेळात राजकारण आणू नका आणि राजकारणाचा खेळ करू नका; पक्षापेक्षा कुणीही मोठा नाही.’

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर