ब्रेकिंग न्यूज
⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ ५ हजार दिले तरी प्रोटीन दिले नाही, राग अनावर, थेट जीम ट्रेनरची हत्या, जालना हादरलं ✦ ⚡ Asian Games : बुटाचं सोल तुटलं तरीही पोरीनं पटकावलं मेडल; कोण आहे सीमा कुमारी? आईला न सांगताच जपानला पोहोचल… ✦ ⚡ महिन्याला दागिने खरेदी करायची अन् VIDEO बनवयायची, चोरट्यांनी Reel पाहून केलं भयानक काडं, नेमकं काय घडलं?
SP News Maregaon

धक्कादायक घटना:अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक कृत्य करुन केला व्हिडीओ; गुन्हा दाखल

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


एका १४ वर्ष सात महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करण्यात आले. या कृत्याचा व्हिडीओसुद्धा काढण्यात आला. याबाबत कुणाला काहीही सांगितल्यास विहीरीत टाकण्याची धमकीसुध्दा पिडीत मुलाला दिली. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. १०) मोर्शी ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून समोर आली. या प्रकरणी पीडित मुलाच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामध्ये एका विधिसंघर्षित बालकाचा समावेश असून दुसऱ्याला पोलिसांनी तत्काळ अटक केली. कुंदन शंकर सायगन (२८) व एक अल्पवयीन असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. कुंदन व विधिसंघर्षित बालकाने पीडित मुलासोबत दोनवेळा अनैसर्गिक कृत्य केले. विधिसंघर्षित बालकाने त्याच्या मोबाइलद्वारे या घाणेरड्या कृत्याचा व्हिडीओसुद्धा काढला. मात्र प्रकरण समोर आल्यानंतर पीडित बालकाने त्याच्या वडिलांसह मोर्शी ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी कुंदन सायगन व विधिसंघर्षित बालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. व्हिडीओ गावातील लोकांनी पाहीला अन्… या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या विधिसंघर्षग्रस्त बालकाने त्याच्या मोबाइलद्वारे काढलेला तो आक्षेपार्ह व्हिडीओ गावातील काहीं लोकांच्या पाहण्यात आला. याबाबत पीडित मुलाच्या चुलत भावाला कळल्यावर त्याने याबाबत त्याला विचारणा केली. त्यावर त्याने आपबिती त्याच्याकडे कथन केली आणि अंत्यत धक्कादायक प्रकरण समोर आले.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर