ब्रेकिंग न्यूज
⚡ बॅगेत चाकू आणला, अमरावतीत कॉलेजमध्येच रक्तरंजित राडा, विद्यार्थिनीच्या गळ्यावर सपासप वार, कारण चक्रावून टाक… ✦ ⚡ हे कसले आई-बाप? पोटच्या बाळाला विकून मोबाईल घेतला, छ. संभाजीनगरात भयंकर प्रकार, बारावी फेल डॉक्टरसह 7 जणांन… ✦ ⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा
SP News Maregaon

परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत इंधन वाचवा:मोदींवर जितकी टीका कराल, तितकेच खड्ड्यात जाल, देशहिताच्या निर्णयावर टीका करणे काँग्रेसची सवय- शिंदे

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


सुरक्षेच्या दृष्टीने ज्या गाड्या गरजेच्या आहेत त्या आमच्या ताफ्यात आहेत. बाकी गाड्या आम्ही कमी केल्या आहेत. इंधंन बचतीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे आवाहन केले आहे, त्याला सर्वांनी प्रतिसाद दिला पाहिजे. यामध्ये कोणीही राजकारण करू नये. आपल्यासाठी देश सर्वांत पहिले असला पाहिजे, असे शिंदेंनी म्हटले आहे. परिस्थिती पूर्ववत होत नाही तो पर्यंत आपण इंधंन बचत केली पाहिजे. गरज असेल तिथे प्रवास केला जाईल जिथे गरज नाही तिथे प्रवास होणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे म्हणाले की, राहुल गांधी यांच्याबद्दल मी काय बोलावे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ज्या ज्यावेळी देशहिताचा निर्णय घेतात त्यावेळी त्यांच्यावर टीका करत असतात. काँग्रेसने 100 हून अधिक वेळा पंतप्रधान मोदी यांच्यावर आरोप केले आहेत. पण आता काँग्रेसची काय परिस्थिती आहे? हे जितके मोदी यांच्यावर टीका करतील जनता तितकीच त्यांना धडा शिकवेल, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौऱ्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे म्हटले आहे. म्हणून काँग्रेस खड्ड्यात जातंय एकनाथ शिंदे म्हणाले की, पश्चिम बंगाल आणि आसाम निवडणुकीच्या निकालाने जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे हे दाखवून दिले आहे. त्यामुळे काँग्रेस पीएम मोदींवर जितके आरोप करेल तितकेच ते खड्ड्यात जातील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहानानंतर एकनाथ शिंदे हे ई कारने विधानभवनात दाखल झाले आहेत. सावे, राणेंचा मंत्रालयापर्यंत पायी प्रवास दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहानानंतर नीतेश राणे यांनी मंत्रालयापर्यंत पायी प्रवास केला. यावेळी बोलताना नीतेश राणे म्हणाले की, मंत्रिमंडळ बैठकीसाठी मी पायी मंत्रालयात जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेपर्यंतचा प्रवास हा दुचाकीवर केला आहे. आम्ही आमच्या ताफ्यातील गाड्या कमी केल्या आहेत. म्हणून देशाच्या सर्वच लोकांनी काटकसर केली पाहिजे. यामध्ये कोणत्याही पक्षाने राजकारण करू नये. हा काही राजकारण करण्याचा विषय नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून ते आवाहन केले आहे. प्रत्येक नागरिकाने ते पाहिले पाहिजे. सर्वांनी केवळ नागरिक म्हणून याकडे पाहिले पाहिजे. आमच्या ताफ्यात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून दोन गाड्या ठेवाव्या लागतात. त्या ठेवाव्याच लागतात. मी EV वापरण्यास सुरूवात केली आहे. तर मंत्री अतुल सावे यांनी सुद्धा आपल्या शासकीय निवासस्थानापासून ते मंत्रालयापर्यंत पायीप्रवास केला.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर