ब्रेकिंग न्यूज
⚡ पुणे हादरलं! बारामतीत माजी सरपंच महिलेसह दोघींचा चिरला गळा, मध्यरात्री झोपेतच डबल मर्डर ✦ ⚡ नाल्यावर हात-पाय धुताना काहीतरी चावले; चार दिवसांनी शेतमजुराचा मृत्यू ✦ ⚡ शिवनी धोबे येथे शेतकरीपुत्राची गळफास घेऊन आत्महत्या ✦ ⚡ कर्ज 9 लाखांचं, 26 लाख देऊनही सावकाराची 25 लाखांची डिमांड, शेतकऱ्यानं पत्नीची माफी मागितली अन्…, कोल्हापू… ✦ ⚡ Jalgaon Cotton Crop News | कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान | Farmer News ✦ ⚡ शिक्षणानंतर शेती करण्याचं धाडस दाखवलं, तरुण शेतकऱ्यानं केली केळीची लागवड, आता लाखात कमाई ✦ ⚡ SIR Maharashtra: तुम्हाला निवडणूक आयोगाची SIR ची नोटीस आलीय? आता कुठेही धावपळ करायची गरज नाही; आला मोठा नि… ✦ ⚡ शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी घेतला शेतीचा निर्णय, श्रेयसने 5 गुंठ्यात केली कमाल, 2 लाख निव्वळ नफा ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV … ✦ ⚡ Premanand Maharaj : प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट! खोलीत संशयास्पद वस्तू, CCTV …
SP News Maregaon

ज्यांचा पक्ष घराणेशाहीवर चालतो, त्यांनी लोकशाहीवर बोलू नये:संजय राऊत हे तर ‘लुटारू सैनिक’, त्यांनी आधी उबाठा संपवली, आता काँग्रेसची बारी- नवनाथ बन

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही. कारण त्यांचा पक्ष लोकशाहीवर नाही तर घराणेशाहीवर चालतो, हे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. राऊतांना कुठेच मान्यता नाही. महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व करण्याच्या दृष्टीने काम करत आहे, त्यासाठी ते रोज राहुल गांधींना सल्ले देतात. उबाठा खड्ड्यात घातल्यानंतर आता काँग्रेस खड्ड्यात घालण्याचे काम राऊतांकडून करण्यात येणार आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत तुम्ही लुटारू सैनिक आहात हे जनतेने पाहिले आहे. तुम्ही महाराष्ट्र, मुंबई, पत्राचाळीची लुट केली. तुम्ही आमच्या प्रदेशाध्यक्षांवर टीका करू नका. तुम्ही लुटारू सैनिक आहात. राधाकृष्ण विखे पाटील, रवींद्र चव्हाण यांनी प्राजक्त तनपुरे यांना विनंती केली आणि ती मान्य केली. तर लक्ष्णण हाके यांनी विनंती दत्ता भरणे यांची विनंती मान्य केली. ही काय धमकी नाही. आम्ही लोकांना साथ देतो म्हणून लोकं आमची विनंती मानतात. राहुरीच्या विकासासाठी साथ नवनाथ बन म्हणाले की, राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे यांनी भाजपला साथ देण्याचे काम केले आहे.त्यांचे मी आभार व्यक्त करतो. काल रवींद्र चव्हाण यांनी त्यांची भेट घेतली, यावेळी राहुरीच्या विकासासाठी त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. संजय राऊत यांनी लोकशाही कुठे आहे, आणि ट्रम्प शाही कुठे आहे हे सांगण्याच्या भानगडीत पडू नये. तुमच्या कार्यकाळात राज्याची वाट लावली तेव्हा तुम्हाला लोकशाहीची आठवण झाली नाही का? असा सवाल बन यांनी केला आहे. उमेदवार नेमका कुणाचा? नवनाथ बन म्हणाले की, बारामतीमध्ये जो उमेदवार काँग्रेसने दिला आहे, तो काँग्रेसचा आहे की मविआचा हे संजय राऊत यांना समजत नाहीये, ते संभ्रमात आहेत. उद्धव ठाकरेंना वाटते की सुनेत्रा पवारांना पाठिंबा द्यावा. पण दुसरीकडे संजय राऊत यांना वाटते की काँग्रेस उमेदवाराला उबाठाने पाठिंबा दिला पाहिजे. हाच संजय राऊतांचा प्रयत्न आहे. काँग्रेसला बारामतीमध्ये पाठिंबा दिला तर ते आपल्याला राज्यसभेची खासदारकी देतील हे लक्षात घेऊन ते काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मविआत त्यांना राहुरी, बारामतीमध्ये काय निर्णय घ्यायचा हे ठरतच नाही. उबाठामध्ये दोन गट नवनाथ बन म्हणाले की, उबाठामध्ये दोन गट पडले आहेत, त्यामुळे त्यांना बारामतीमध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा हे समजत नाही. राऊतांचा गट काँग्रेस तर उद्धव ठाकरेंचा गट सुनेत्रा पवारांना पाठिंबा द्यावे म्हणतोय. त्यांच्यातील हा वाद आता समोर आला आहे. उबाठामध्ये बारामती पोटनिवडणुकीवरून प्रचंड गोंधळ आहे. देवाभाऊंच्या कार्यकाळात अनेक कामे सुरू नवनाथ बन म्हणाले की, काँग्रेसच्या काळात मुंबईमध्ये केवळ एक मेट्रो होती. तर देवाभाऊंच्या कार्यकाळात 11 मेट्रोची कामे सुरू आहेत. यातील दोन मेट्रोचे आज उद्घाटन झाले. नागरिकांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम देवाभाऊंच्या माध्यमातून सुरू आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर