ब्रेकिंग न्यूज
⚡ News18 Marathi Headlines | 16 NOV | 9 AM | Maharashtra Politics | Fadnavis |Shinde | NCP| FDA ✦ ⚡ IND vs PAK : 1 बॉल 3 रन… टीम इंडियाने शेवटच्या बॉलवर नांग्या ठेचल्या; पाकिस्तानच्या पब्लिकचा रस्त्यावर हा… ✦ ⚡ देवदर्शनासाठी गेलं कुटुंब, घरी कोणीही नसल्याची साधली संधी, नाशिकमध्ये 12 लाखांची चोरी ✦ ⚡ मारेगाव तालुक्यात २ कोटी २२ लाखांच्या विकासकामांचा धडाका! ✦ ⚡ मारेगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत लक्ष्मीपूजन; नवनिर्वाचित संचालिका किरणताई देरकर यांचा सन्मान ✦ ⚡ IND vs NZ 5th ODI : टीम इंडिया 34-3… न्यूझीलंडमध्ये ROKO चा ‘एन्ड गेम’, ज्याची भीती होती तेच झालं! गंभीरन… ✦ ⚡ Pune Amit Shah: पुणेकरांनो लक्ष द्या! अमित शहांच्या दौऱ्यानिमित्त पुढील 2 दिवस वाहतुकीत मोठे बदल, कोणते मार… ✦ ⚡ पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, डाळिंबाच्या बागेत केली वांग्याची शेती, 3 लाख रुपयांचा निव्वळ नफा,… ✦ ⚡ Karad: बँक मॅनेजरने राहत्या प्लॅटमध्ये संपवलं आयुष्य, ‘त्या’ चिठ्ठीनं खळबळ, कराडात काय घडलं? ✦ ⚡ पुण्याहून नागपूरला जाणाऱ्या बसवर काळाचा घाला, थेट पूलावरून खाली कोसळली गाडी, 21 हून अधिक प्रवासी बसमध्ये
SP News Maregaon

डोळ्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान 6 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू:दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील घटनेने खळबळ; चुकीची भूल दिल्याचा पालकांचा गंभीर आरोप

1 View
🔊
बातमी ऐका (Marathi Voice Reader)


पुण्यातील एरंडवणे परिसरातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका ६ वर्षांच्या चिमुरडीचा डोळ्यांच्या शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियांशी जितेंद्र बागडे असे मृत मुलीचे नाव असून, तिच्या पालकांनी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच मुलीचा बळी गेल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांशीला डोळ्यांच्या तिरळेपणा आणि काचबिंदूच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी सकाळी तिला शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. “माझी मुलगी आत जाताना पूर्णपणे शुद्धीत होती आणि खेळत होती, मग अचानक असे काय झाले?” असा टाहो तिच्या वडिलांनी फोडला आहे. शस्त्रक्रिया सुरू असतानाच मुलीची प्रकृती खालावली आणि डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. नातेवाईकांनी आरोप केला आहे की, उपचारादरम्यान मुलीच्या तोंडातून रक्त येत होते, जे डॉक्टरांच्या अक्षम्य चुकीकडे बोट दाखवते. चुकीच्या भुलीमुळे (ॲनेस्थेशिया) किंवा उपचारातील हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा संशय पालकांनी व्यक्त केला आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. अलंकार पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. “ससूनच्या वैद्यकीय समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे अधिकृत कारण स्पष्ट होईल आणि त्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे पोलिसांनी सांगितले आहे.

ही बातमी शेअर करा
विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क, मारेगाव विदर्भातील घडामोडींपासून राज्य, देश आणि जगभरातील ताज्या, अचूक व विश्वासार्ह बातम्या सर्वात आधी आपल्या भेटीला. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, गुन्हे, सामाजिक, कृषी, शिक्षण, क्रीडा, मनोरंजन आणि विशेष रिपोर्ट्स एका क्लिकवर. सत्याला आवाज देणारे, जनतेचा विश्वास जपणारे आपले हक्काचे न्यूज पोर्टल – विदर्भ एस.पी. न्यूज नेटवर्क मारेगाव.
प्रतिक्रिया द्या
⚡ मारेगाव फ्लॅश व्हिडिओ पहा
↓ रिफ्रेश करण्यासाठी खाली ओढा
💬 चॅटवर शेअर करा 📢 स्टेटसवर शेअर करा
📱 नेटिव्ह शेअर